शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
3
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
4
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
5
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
6
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
7
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
8
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
9
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
10
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
11
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
12
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
13
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
14
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
15
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
16
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
17
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
18
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
19
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
20
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
Daily Top 2Weekly Top 5

फलटण, कऱ्हाडमधील नऊजण हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 13:58 IST

जबरी चोरी, मारामारी असे गंभीर विविध गुन्हे दाखल असलेल्या फलटण आणि कऱ्हाडमधील नऊजणांना पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी एक वर्षासाठी हद्दपार केले आहे.

ठळक मुद्देफलटण, कऱ्हाडमधील नऊजण हद्दपारसंशयितांना वेळोवेळी सुधारण्याची संधी

सातारा : जबरी चोरी, मारामारी असे गंभीर विविध गुन्हे दाखल असलेल्या फलटण आणि कऱ्हाडमधील नऊजणांना पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी एक वर्षासाठी हद्दपार केले आहे.अविनाश पंढरीनाथ जाधव, टोळीप्रमुख (वय २५, रा. काळुबाईनगर, मलटण, ता. फलटण), सागर हरीचंद्र डांगे (वय २२, रा. लक्ष्मीनगर, फलटण), अजय कल्लू बेनकर (वय २०, रा. नागेश्वर, चौधरवाडी, फलटण), अक्षय बाळकृष्ण माने (वय २२, रा. शंकर मार्केटजवळ, फलटण), विशाल सुरेश इंगळे (वय १९, रा. मंळवार पेठ, सातारा), विजय राजेंद्र देशमुख (वय २६, रा. समर्थ मंदिर, फलटण),मनिष महेंद्र काकडे (वय १९, रा. मंगळवार पेठ, फलटण) अशी हद्दपार करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या टोळीवर फलटण येथे जबरी चोरी आणि घरफोडीचे विविध गुन्हे दाखल आहेत. या सातजणांना सातारा जिल्हा तसेच बारामती, पुरंदर, माळशिरस तालुक्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे.दरम्यान, कऱ्हाड शहर व परिसरात गर्दी मारामारी करणाऱ्या टोळीचा प्रमुख सिकंदर गुलाब शेख-ताशेवाले (वय ३९, रा. लक्ष्मीनगर, मलकापूर, ता. कऱ्हाड ), मजहर बद्रुह्ीन पीरजादे (वय २९, रा. बिरोबा मंदिराजवळ, मलकापूर, कऱ्हाड ) या दोघांना सातारा जिल्हा तसेच खानापूर, कडेगाव, वाळवा तालुक्यातील एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. बेकायदा जमाव जमवून या दोघांनी टोळी तयार केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

गर्दी मारामारीसारखे गंभीर गुन्हे या दोघांवर दाखल आहेत. या दोन्ही टोळीतील संशयितांना वेळोवेळी सुधारण्याची संधी देण्यात आली होती. मात्र, त्यांच्यामध्ये काहीही सुधारणा झाली नाही. त्यामुळे त्यांच्यावर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर