शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

आघाडीतल्या बिघाडीची उदयनराजेंकडून दुरुस्ती!

By admin | Updated: July 16, 2014 01:22 IST

उपनगराध्यक्षपद : शेख-गोडसे यांना प्रत्येकी साडेसात महिने संधी

सातारा : सातारा विकास आघाडीत उपनगराध्यक्षपदावरुन गेल्या काही दिवसांपासून धुसफूस सुरु होती. ही धुसफूस कमी करुन आघाडीच्या बिघडलेल्या गाडीला दुरुस्त करण्याचे काम ‘साविआ’चे अध्यक्ष खासदार उदयनराजे भोसले यांनी केले आहे, त्यामुळे ही धुसफूस कमी होईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.सातारच्या उपनगराध्यक्षपदासाठी दिनाज शेख यांच्यासोबतच दीपाली गोडसे याही इच्छुक होत्या. सातारा विकास आघाडीकडे नगराध्यक्षपद असताना या दोघींसह माजी नगराध्यक्षा सुजाता राजेमहाडिक, नगरसेविका माधुरी भोसले, सुवर्णा पाटील यांच्यात या पदासाठी रस्सीखेच सुरु होती. अगदी शेवटच्या टप्प्यात सुजाता राजेमहाडिक यांना नगराध्यक्षपद दिले गेल्यानंतर दीपाली गोडसे व दिनाज शेख यांची नाराजी स्पष्टपणे दिसून आली होती. उपनगराध्यक्षपदाच्या निवडीवरुन पुन्हा एकदा रस्सीखेच सुरु झाली होती. दिनाज शेख, दीपाली गोडसे यांच्यासोबतच विरोधी पक्षनेते अ‍ॅड. बाळासाहेब बाबर यांचेही नाव चर्चेत होते. मात्र, आघाडीतील सदस्यांचा अ‍ॅड. बाबरांना असलेल्या विरोधामुळे त्यांचे नाव मागे पडले. आघाडीअंतर्गत दोन गट पडले. यापैकी एक गट दीपाली गोडसे यांच्यासाठी तर दुसरा गट दिनाज शेख यांच्या नावासाठी आग्रही होता. या दोघींचीही नाराजी लक्षात घेता आघाडीतील तणाव आणखी वाढू न देण्याचे धोरण उदयनराजेंनी आखल्याचे चित्र सोमवारी स्पष्ट झाले. खासदार उदयनराजेंनी दिनाज शेख यांचे नाव जाहीर केले. मात्र, दीपाली गोडसे नाराज होऊन तिथून निघून गेल्या. या नाराजीच्या पार्श्वभूमीवर उदयनराजेंनी उपनगराध्यक्षपदाची प्रत्येकी साडेसात महिने विभागणी करणार असल्याचे या बैठकीत जाहीर केल्याची माहिती आघाडीतील अधिकृत सूत्रांनी दिली. दरम्यान, सहा महिन्यांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर आपल्याला उपनगराध्यक्षपद देण्याचा शब्द उदयनराजेंनी दिला असल्याचे दीपाली गोडसे यांनी सांगीतले. तर पहिले साडेसात महिने दिनाज शेख पदावर राहतील. त्यानंतर पुढील वर्षी दीपाली गोडसे यांची निवड केली जाणार असल्याचे आघाडीच्या अधिकृत सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)