शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पोट दुखणाऱ्या 'त्या' विरोधकांसाठी मोफत दवाखाना; एकनाथ शिंदे यांचा विरोधकांना चिमटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 11:46 IST

मी दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही अशी ग्वाही दिली होती. त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जाऊ लागले

सातारा : ‘मी दिल्लीत जावे अथवा गावाकडे, अनेकांची पोटदुखी सुरू होते. अशांचा मी विचार करत नाही. सर्व पोटदुखीवाल्यांची व्यवस्था आम्ही केली असून, त्यांच्यासाठी मोफत बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू केला असल्याचा चिमटा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला. याविषयीचा त्यांचा व्हीडीओ समाज माध्यमावर व्हायरल होत आहे.सातारा जिल्हा दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी दरे गावातील शिवारात फेरफटका मारला. यावेळी माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. एकनाथ शिंदे म्हणाले, विरोधकांकडे सध्या मुद्दाच नाही. त्यामुळे ते कोणत्याही गोष्टीचे राजकारण करत आहेत.नुकसान झालेल्या शेतकऱ्यांकडे ३२ हजार कोटी रुपयांचे पॅकेज करेन, याची त्यांनी कल्पना केली नव्हती. मी दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही अशी ग्वाही दिली होती. त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जाऊ लागले. त्यामुळे मुद्दा नसल्यामुळे ते दिशाभूल करत आहेत. जर चांगला निर्णय घेतला तर त्याला चांगले म्हटले पाहिजे.हेच लोक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुष्पगुच्छ देऊन चांगले मुख्यमंत्री आहेत, असे म्हणत होते. आता मात्र मुख्यमंत्री कसे अपयशी आहेत, हे सांगत सुटले आहेत. ही त्यांची दुटप्पी भूमिका आहे. हे त्यांचे कायमचे रडगाणे आहे. बाळासाहेबांनी आम्हाला रडायला नाही तर लढायला शिकवले, असा टोलाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला.

English
हिंदी सारांश
Web Title : Free clinic for 'aching stomach' opposition: Eknath Shinde's taunt.

Web Summary : Eknath Shinde taunted opponents, stating their 'stomach ache' (criticism) began when he worked. He announced a free Balasaheb Thackeray clinic for them. Shinde criticized the opposition for politicizing issues and changing stances, highlighting government support for farmers. He accused them of hypocrisy.