सातारा: देशी दारू दुकानाचे लायसन देण्याच्या नावाखाली दहा लाखाची फसवणूक, दोघांविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2022 13:57 IST2022-11-23T13:56:57+5:302022-11-23T13:57:42+5:30
कोरेगाव : देशी दारू दुकानाचे लायसन मिळवून देतो, असे सांगून कोरेगावातील व्यावसायिकाची दहा लाखाची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी ...

सातारा: देशी दारू दुकानाचे लायसन देण्याच्या नावाखाली दहा लाखाची फसवणूक, दोघांविरोधात गुन्हा दाखल
कोरेगाव : देशी दारू दुकानाचे लायसन मिळवून देतो, असे सांगून कोरेगावातील व्यावसायिकाची दहा लाखाची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी कोरेगाव पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहिती अशी की, कोरेगावात शशिकांत पांडुरंग घोडके हे सेवानिवृत्त असून, व्यावसायिक आहेत. त्यांना देशी दारू दुकानाचे लायसन मिळवून देण्याचे आमिष ओगलेवाडीतील रहिवासी विनायक शंकर रामुगडे आणि कोरेगाव शहरातील कलावती ऊर्फ प्रिया रामचंद्र चव्हाण यांनी दाखविले होते. या दोघांनी घोडके यांचा विश्वास संपादन करुन वेळोवेळी ९ लाख ८१ हजार ५०० रुपये उकळले. अन् लायसन दिले नाही. आपली फसवणूक झाल्याचे घोडके यांच्या लक्षात येताच त्यांनी याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली.
घोडके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोरेगाव पोलीस ठाण्यात दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक नितीन सावंत याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.