शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
2
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
3
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत आतापर्यंत ८.१ टक्के मतदान;पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान हातबॉम्ब फेकले; अनेक जखमी
4
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
5
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
6
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
7
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
8
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
9
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
10
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
11
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
12
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
13
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
14
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
15
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
16
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
17
महिला क्रिकेटरचा 'हनीट्रॅप' गेम! व्यावसायिकाला ६३ लाखांना लुटले, मुंबई पोलिसांनी श्रीनगरमधून उचलले
18
"रिद्धी खूप खूश झाली अन्..." राकेश बापटने सांगितली एक्स वाईफची कशी होती प्रतिक्रिया
19
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
20
‘पंतप्रधान मोदींना लक्ष्य करणे म्हणजे थेट १४० कोटी भारतीयांचा अपमान’, एकनाथ शिंदेंची खर्गेंवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

माजी पोलीस पाटलाच्या मुलाला पोलिसाकडून रस्त्यावर मारहाण

By admin | Updated: November 6, 2014 22:58 IST

नातेवाइकांचा आरोप : जखमी मुलावर रुग्णालयात उपचार

कऱ्हाड : हिंगनोळे येथील माजी पोलीस पाटील पोपट थोरात यांचा मुलगा देवदत्त याला उंब्रज पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबलने बेदम मारहाण केल्याचा आरोप कऱ्हाडात पत्रकार परिषदेत केला. पोपट थोरात यांनी दिलेली माहिती अशी की, त्यांचा मुलगा देवदत्त हा बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून चोरे रस्त्यावरून निघाला असताना पोलीस कॉन्स्टेबल मारेकरी याने त्याला अडविले. अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करीत त्याने देवदत्तला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी देवदत्तचे चुलतभाऊ महेंद्र त्याठिकाणी आले. त्यांनी देवदत्तला करीत असलेल्या मारहाणीबाबत संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला विचारणा केली. तसेच ‘तुम्ही कायदेशीर कारवाई करा, देवदत्तला मारहाण करू नका,’ अशी विनंती केली. त्यावेळी पोलीस कर्मचाऱ्याने महेंद्र यांनाच शिवीगाळ केली. ‘त्याठिकाणी आलेल्या मुकुंद गोळे यांच्याशीही संबंधित पोलीस कर्मचाऱ्याने उद्धट वर्तन केले. त्यामुळे मुकुंद गोळे यांनी याबाबत देवदत्तचे वडील पोपट थोरात यांना फोनवरून माहिती दिली. गोळे यांनी पोपट थोरात यांना फोन केला असतानाही संबंधित कर्मचाऱ्याकडून देवदत्तला मारहाण सुरूच होती. मारहाण केल्यानंतर पोलीस कर्मचारी देवदत्तला घेऊन पोलीस ठाण्यात गेला. त्याठिकाणी देवदत्तच्या हातातील सुमारे ५५ हजारांची अंगठी व १ हजार ६०० रुपयांची रोकड काढून घेण्यात आली. पोलीस ठाण्यातील एका खोलीत नेऊन पुन्हा देवदत्तला लाथाबुक्क्या व पट्ट्याने मारहाण करण्यात आली. या मारहाणीमुळे देवदत्त बेशुद्ध पडला. काही वेळानंतर सहायक पोलीस निरीक्षक पाटील यांनी देवदत्तला शासकीय गाडीमधून उंब्रजच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. त्याठिकाणी डॉ. नाथ यांनी तपासणी करून त्याला पुढील उपचारार्थ कऱ्हाडला नेण्याचा सल्ला दिला. त्यानंतर पुढील उपचारासाठी देवदत्तला कऱ्हाडच्या सह्याद्री रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. देवदत्तवर उपचार सुरू आहेत. खुनीहल्ला करणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबल मारेकरी याला बडतर्फ करून त्याच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही थोरात यांनी केली आहे. याबाबत अर्ज मुख्यमंत्री, विभागीय पोलीस आयुक्त, पोलीस महानिरीक्षक, पोलीस अधीक्षक यांना दिला आहे. (प्रतिनिधी)हा आरोप पूर्णपणे खोटा असून कोणालाही मारहाण झालेली नाही. पोपट थोरातांनी पोलीस खात्यावर केलेल्या तक्रारीची चौकशी झाल्यानंतर सत्य बाहेर येईलच. - मारुती पाटील, सहायक पोलीस निरीक्षक