शहरं
Join us  
Trending Stories
1
अयोध्येमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट, घर कोसळून ५ जणा्ंचा  मृत्यू, अनेक जण अडकल्याची भीती  
2
ओवेसींच्या सभेतून वारिस पठाण यांचं नितेश राणेंना आव्हान, म्हणाले, ‘दोन पायांवर येशील, पण…’ 
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या गळ्यात शांततेचं नोबेल, नेतन्याहू यांनी शेअर केला असा फोटो, म्हणाले…
4
"सामाजिक विषमता निर्माण करण्याला शरद पवार जबाबदार', मनोज जरांगेंच्या भेटीनंतर राधाकृष्ण विखेंचा आरोप 
5
आठव्या क्रमांकाच्या बॅटरनं वाचवलं; पण तोच डाव उलटा फिरला!.. अन् टीम इंडियासमोर आफ्रिकेनं मारली बाजी
6
'हो, ते प्रवासी विमान आम्ही पाडलं होतं', अनेक महिन्यांनंतर व्लादिमीर पुतीन यांची कबुली
7
मनात नसताना रोहित-विराट 'तो' निर्णय घेणार? मोठी माहिती आली समोर
8
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला शरद पवारांचे खासदार निलेश लंकेंनी दिल्लीत गाठले; त्यानंतर...
9
महिलेने रडत रडत केला फोन, पोलिसांना सांगितलं पतीचं गुपित, घराची झडती घेताच बसला धक्का 
10
क्रिकेटच्या मैदानात AI ची ‘बोलंदाजी’! मिताली राजनं पिच रिपोर्टसाठी घेतली गुगल ‘जेमिनी’ची मदत, अन्...
11
आता भारतातच मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण; ब्रिटनची 9 विद्यापीठे उघडणार कॅम्पस
12
UNSC मध्ये भारताला ब्रिटनचा पाठिंबा! मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब; खलिस्तानवाद्यांवर कारवाईची मागणी
13
रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत सापडली महिला; शुद्धीवर आल्यावर सांगितलं असं; ऐकून सगळेच चक्रावले!
14
शाब्बास रिचा! सेंच्युरी हुकली; पण 'नॉट रिचेबल' वाटणारा टप्पा गाठला अन् मोठा डावही साधला
15
रावळपिंडी चिकन टिक्का, बहावलपूर नान, तर..., हवाई दलाच्या मेन्यू कार्डमधून पाकिस्तानची खिल्ली
16
शुभमन गिलच्या कर्णधारपदावर सौरव गांगुलींचे मोठे विधान, म्हणाला...
17
वारंवार मागणी केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळेल? शर्यतीत कोण? जाणून घ्या...
18
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
19
रोहित पवारांच्या मातोश्रींकडून गुंड निलेश घायवळचे कौतुक; सचिन घायवळसोबतचेही फोटो आणले समोर
20
Crime: एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला, ५०० सीसीटीव्हीच्या मदतीने हल्लेखोराला अटक

Shamrao Ashtekar: माजी मंत्री शामराव आष्टेकर यांचे निधन, त्यांच्या काळात झाला सातारा जिल्ह्याचा सर्वांगीण विकास

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 16:45 IST

Shamrao Ashtekar Passes Away: पुरोगामी लोकशाही दल ते राष्ट्रवादी काँग्रेस हा त्यांचा राजकीय प्रवास हा शरद पवार यांच्या सोबत एकनिष्ठतेने राहिला

कराड : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार व माजी मंत्री शामराव आष्टेकर (वय ९१) यांचे बुधवारी पुण्यातील त्यांच्या राहत्या घरी बिबेवाडी येथे निधन झाले. सायंकाळी पुणे येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.शाम ऊर्फ जनार्दन बाळकृष्ण आष्टेकर यांचा जन्म २ ऑगस्ट १९३४ रोजी कराड येथे झाला. त्यांचे शिक्षण कराड येथील टिळक हायस्कूलमध्ये झाले. कराडचे उपनगराध्यक्ष म्हणून त्यांनी १० वर्षे काम पाहिले. १९८५ साली कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातून ते आमदार म्हणून निवडून आले. पुन्हा १९९० ला ते आमदार झाले. यादरम्यान ९ वर्षे त्यांनी क्रीडा, सांस्कृतिक व उद्योग विभागाचे मंत्रिपद भूषविले. सातारा जिल्हा व उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनदेखील त्यांनी काम पाहिले.महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन, भारतीय ऑलिम्पिक संघटना, महाराष्ट्र कबड्डी असोसिएशन अशा अनेक विविध संस्थांवर नेतृत्व केले. तळबीड एमआयडीसीचे स्वप्न उराशी बाळगून प्रयत्न केले. त्यामुळे कराडमध्ये एमआयडीसी स्थापन झाली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बालेवाडी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या या काळात कराड व सातारा जिल्ह्याचा सर्वांगीण विकास झाला. त्यांच्या पश्चात एक मुलगा, मुलगी व पत्नी असा परिवार आहे.

राजकीय प्रवास..सुरुवातीपासून पुरोगामी लोकशाही दल ते राष्ट्रवादी काँग्रेस हा त्यांचा राजकीय प्रवास हा शरद पवार यांच्या सोबत एकनिष्ठतेने राहिला. राजकारणामधील एक निष्कलंक, निष्ठावान व समाजाभिमुख नेतृत्व म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला.

English
हिंदी सारांश
Web Title : Former Minister Shamrao Ashtekar Passes Away; Developed Satara District

Web Summary : Former Minister Shamrao Ashtekar (91) passed away in Pune. He served as minister and MLA, contributing significantly to Satara's development, especially in sports and industry. He played a key role in establishing the MIDC and the Balewadi sports complex.
टॅग्स :Deathमृत्यूSatara areaसातारा परिसरKaradकराडMLAआमदारNCPराष्ट्रवादी काँग्रेस