शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

पार्किंगच्या कारणावरून साताऱ्यातील माजी नगरसेवकाचा हवेत गोळीबार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 00:10 IST

सातारा : पार्किंगच्या कारणातून हवेत गोळीबार केल्याप्रकरणी संशयित माजी नगरसेवक महेश जगताप (रा. सदर बझार, सातारा) यांना पोलिसांनी रात्री ...

सातारा : पार्किंगच्या कारणातून हवेत गोळीबार केल्याप्रकरणी संशयित माजी नगरसेवक महेश जगताप (रा. सदर बझार, सातारा) यांना पोलिसांनी रात्री उशिरा त्यांच्या बंगल्यातून ताब्यात घेतले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत कोणताही गुन्हा नोंद झाला नव्हता. दरम्यान, अधिक चौकशी करून संशयितांना ताब्यात घेतले जाईल, अशी माहिती घटनास्थळी आलेल्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनीही दिली.याबाबत अधिक माहिती अशी, माजी नगरसेवक महेश जगताप यांचा सदर बझारमध्ये बंगला आहे. तेथील बंगल्यासमोरीलच पार्किंग व इतर किरकोळ कारणावरून जगताप यांनी एकाला मारहाण केली. तसेच हवेत गोळीबार केला. यावेळी त्यांच्याबरोबर अन्य एक संशयित होता. ही घटना गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली.या गोळीबाराची माहिती मिळताच पोलीस महेश जगताप यांच्या सदर बझारमधील बंगल्याजवळ पोहोचले. त्यानंतर पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, सहायक पोलीस अधीक्षक समीर शेख, पोलीस निरीक्षक विजय कुंभार घटनास्थळी आले. त्यांच्याबरोबर पोलीस बंदोबस्तही होता. त्यानंतर बंगल्यात जाऊन जगताप यांच्याकडे चौकशी केली. रात्री पावणेनऊच्या सुमारास पोलिसांनी जगताप यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत सातारा शहर पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा नोंद झाला नव्हता.दरम्यान, पत्रकारांशी बोलताना पोलीस अधीक्षक सातपुते म्हणाल्या, ‘पार्किंगच्या व इतर किरकोळ कारणातून हवेत गोळीबार झाल्याने आम्ही आलो होतो. याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतले असून, दुसºयाचा शोध सुरू आहे. अधिक चौकशी केल्यानंतर सर्व चित्र समोर येईल.’