शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

यवतेश्वर घाटातील झरा पाईपात गुंडाळला, पर्यटक गायब ; वानरांना मिळणारा खाऊही थांबला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 12:25 PM

सातारा-कास मार्गावरील पर्यटकांना नेहमीच मोहित करणारा, पावसाळयात खळाळून वाहणारा धबधबा पाईपात गुंडाळला गेला आहे. पाईपच्या माध्यमातून ते पाणी टाकीत साठवून पूल बांधण्यासाठी वापरले जात आहे. परंतु, छोटा धबधबा बंद झाल्याने पर्यटकांना सेल्फी, फोटोसेशनला मुकावे लागत आहे.

ठळक मुद्देछोटा धबधबा बंद झाल्याने पर्यटकांचे तेथे थांबणे झाले कमी पर्यटक मुकले सेल्फी, फोटोसेशनला बांधकामासाठी पाणी वापरणे सोईचे, परंतु धबधबाच गुंडाळला पाईपात

पेट्री : सातारा-कास मार्गावरील पर्यटकांना नेहमीच मोहित करणारा, पावसाळयात खळाळून वाहणारा धबधबा पाईपात गुंडाळला गेला आहे. पाईपच्या माध्यमातून ते पाणी टाकीत साठवून पूल बांधण्यासाठी वापरले जात आहे. परंतु, छोटा धबधबा बंद झाल्याने पर्यटकांना सेल्फी, फोटोसेशनला मुकावे लागत आहे. पर्यटकांचे तेथे थांबणेही कमी झाल्याने खाऊ कमी झाल्याने वानरसेना गायब झाली आहे.जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कास, बामणोलीला जाण्यासाठी पर्यटकांना यवतेश्वर घाटातून प्रवास करावा लागतो.

कास, बामणोली पर्यटनस्थळी जिल्हा, परजिल्ह्यातुन पर्यटकांची वर्षभर वर्दळ असते. शनिवार, रविवारी सुटीच्या दिवशी पर्यटकांची गर्दी वाढते. वाहनचालक, नोकरदार, शाळा-महाविद्यालयीन तरूणाई, शाळकरी मुलांची सतत वर्दळ असते.यवतेश्वर घाटात ठिकठिकाणी लहान मोठे धबधबे तयार झाले आहेत. पाणी वाहण्याचे प्रमाण कमी कमी होत जात उन्हाळ्यात अत्यल्प म्हणजेच थेंबथेंब पाणी पडताना दिसते. तेथे प्रवासी हमखास थांबून काही वेळ आराम करतात.सांबरवाडी हद्दीत धबधब्यापासून काही अंतरावर झरा आहे. या झऱ्याचे पाणी हौदात आले आहे.

हौदातील पाणी ओव्हरफ्लो झाले की तुटलेल्या पाईपलाईन मधून पाणी यवतेश्वर घाटातील या कडेकपारीतून वाहू लागते. हिवाळ्यानंतर पाणी कमी-कमी होत जाते. सद्या झऱ्यातून बऱ्यापैकी पाणी वाहत असते. तेथे पर्यटक थांबत असल्याने समोरच दगडावर, संरक्षक कठड्यावर वानरे ओळीत बसलेली असतात. पर्यटकही त्यांना खाऊ देतात.

या मार्गावर दीड महिन्यापूर्वी खचलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. झऱ्यातून वाया जाणारे पाणी बांधकामासाठी मुबलक प्रमाणात उपलब्ध झाले आहे.

थेट तुटलेल्या लोखंडी पाईपलाईनला पाईप लावून टँकरद्वारे बांधकामासाठी पाणी वापरणे सोईचे झाले आहे. परंतु झरा अथवा धबधबा पाईपातच गुंडाळला गेल्याने पर्यटकांचे फोटोसेशनसाठी थांबण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे वानरसेनेला खाद्य पदार्थ मिळणेही कमी झाले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरwater transportजलवाहतूक