In the five days ten thousand gold and 5 thousand cash stolen | पाचवडमध्ये दहा तोळे सोन्यासह ४३ हजारांची रोकड चोरीस
पाचवडमध्ये दहा तोळे सोन्यासह ४३ हजारांची रोकड चोरीस

ठळक मुद्देपाचवडमध्ये दहा तोळे सोन्यासह ४३ हजारांची रोकड चोरीसश्वान पथकास पाचारण करून चोरांचा माग काढण्याचा प्रयत्न

पाचवड : पाचवड-वाई रस्त्यावर असलेल्या बाजारपेठेमधील राहत्या घरात चोरट्यांनी डल्ला मारून सुमारे दहा तोळे सोने व ४३ हजार रुपयांची रोकड, अशी सुमारे साडेचार लाख रुपयांची चोरी केली. ही चोरी गुरुवार, दि. २३ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, पाचवड येथील मटण मार्केटच्या पाठीमागील बाजूस राहते घर बंद अवस्थेत होते. या घरामधील सर्वजण एका घरगुती कार्यक्रमानिमित्त म्हसवे, ता. जावळी या ठिकाणी गेले होते.

याचा फायदा घेत बंद घराचे कुलूप चोरट्यांनी तोडून घरात प्रवेश केला. यावेळी सुमारे दहा तोळे सोने व ४३ हजार रुपयांची रोख रक्कम, असा सुमारे साडेचार लाखांचा ऐवज लंपास केला.

घरातील कुटुंबीय शुक्रवार, दि. २४ रोजी पाचवड येथे आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. या घटनेची माहिती समजताच भुर्इंजचे सहायक पोलीस निरीक्षक श्याम बुवा यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच श्वान पथकास पाचारण करून चोरांचा माग काढण्याचा प्रयत्न केला.

Web Title: In the five days ten thousand gold and 5 thousand cash stolen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.