सातारा : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग ओलांडत असताना काशीळ (ता. सातारा) येथे बापलेकाला भरधाव कारने जोरदार धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या वडिलांचा मृत्यू झाला. हा अपघात ३१ जानेवारी रोजी सायंकाळी झाला.संतोष शंकर पवार (वय ३९, रा. म्हावशी, ता. पाटण, सध्या रा. शिवराजगनर, काशीळ, ता. सातारा) असे अपघातातमृत्यू झालेल्या वडिलांचे नाव आहे. याबाबत राज संतोष पवार (१३, रा. म्हावशी, ता. पाटण) याने बोरगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.राज व त्याचे वडील काशीळ येथे सायंकाळी सात वाजता महामार्ग ओलांडत होते. त्यावेळी कराड बाजूकडून भरधाव आलेल्या पांढऱ्या रंगाच्या कारने (एमएच. १२, एफयू. ७३९९) दोघांनाही जोरदार धडक दिली. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले. दोघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वडील संतोष पवार यांचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला.
Web Summary : A speeding car hit a father and son crossing a highway near Satara. The father, Santosh Pawar, succumbed to his injuries in the hospital. The incident occurred on January 31st in Kashil.
Web Summary : सतारा के पास राजमार्ग पार करते समय एक तेज रफ्तार कार ने पिता और पुत्र को टक्कर मार दी। पिता संतोष पवार की अस्पताल में चोटों के कारण मौत हो गई। घटना 31 जनवरी को काशील में हुई।