सातारा कारागृहात बंद्यांसाठी ‘फास्ट फूड कोर्स’चे आयोजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 16:32 IST2025-03-26T16:31:17+5:302025-03-26T16:32:14+5:30

सातारा : मुकुल माधव फाउंडेशन, पुणे व मुंबई कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी व सातारा जिल्हा कारागृह ...

Fast Food Course organized for prisoners in Satara Jail | सातारा कारागृहात बंद्यांसाठी ‘फास्ट फूड कोर्स’चे आयोजन

सातारा कारागृहात बंद्यांसाठी ‘फास्ट फूड कोर्स’चे आयोजन

सातारा : मुकुल माधव फाउंडेशन, पुणे व मुंबई कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी व सातारा जिल्हा कारागृह यांच्या संयुक्त विद्यमाने कारागृहातील पुरुष बंद्यांसाठी फास्ट फूड प्रशिक्षण कोर्सची सुरुवात करण्यात आली.

महाराष्ट्र कारागृह पोलिस विभागाचे अपर पोलिस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा डॉ. सुहास वारके, विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर, कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांच्या मार्गदर्शनानुसार कारागृह विभागाच्या ‘सुधारणा पुनर्वसन’ या ब्रीदवाक्यानुसार कारागृहातील बंद्यांसाठी विविध उपक्रम राबवण्याबाबत आदेशित करण्यात आलेले आहे. त्यानुसार सातारा जिल्हा कारागृहात विविध प्रशिक्षणाभिमुख उपक्रम राबविण्यात येत आहेत.

कारागृह अधीक्षक श्यामकांत शेडगे म्हणाले, कारागृहात दाखल होणारा प्रत्येक बंदी हा प्रथमतः माणूस आहे. माणसाला सुधारण्याची संधी मिळावी, यासाठी कारागृह प्रशासन नेहमीच अविरत कार्य करत असते. याचाच एक भाग म्हणून कारागृहात सद्य:स्थितीत असलेला बहुतांश युवक व तरुण वर्ग यांचा वेळ वाया जाऊ नये, यासाठी फास्ट फूडचा कोर्स सुरू करण्यात आला आहे. या कोर्समधून बंद्यांना पाणीपुरी, रगडापुरी, कचोरी, वडापाव, मिसळपाव, समोसा, उपवासाचे पॅटीस, कांदा भजी, बटाटा भजी, गोबी मंच्युरियन, व्हेज मंच्युरियन, हक्का नूडल्स, फ्राईड राईस, व्हेज मोमोज, बर्गर, पास्ता, पिझ्झा असे विविध पदार्थ शिकवण्यात येणार आहेत.

यावेळी मुकुल माधव फाउंडेशनचे प्रतिनिधी संतोष शेलार, कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंटचे प्रतिनिधी विनोद जाधव, कारागृह अधीक्षक श्यामकांत शेडगे, वरिष्ठ तुरुंग अधिकारी ज्ञानेश्वर दुबे, सुभेदार मानसिंग बागल, हवालदार दारकू पारधी, शिपाई राकेश पवार, बालाजी मुंडे, रविराज शेळके व इतर कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Fast Food Course organized for prisoners in Satara Jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.