शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

मीटर न बघताच शेतीपंपाचे बिल हातात...

By admin | Updated: November 21, 2015 00:24 IST

पाटण तालुका : ठेकेदाराचा मनमानीपणा; वीजवितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचे उद्धट वर्तन

मल्हारपेठ : वीजविरतण कंपनीने अजब कारभार केला असून मीटर न पाहताच शेतीपंप मालकास बिल दिले आहे. रिडिंग ठेकेदाराचा मनमानी कारभार तर वीजवितरण कर्मचाऱ्यांचे ग्राहकांशी उद्धट वर्तन यामुळे उरुल, ठोमसे बोडकेवाडीतील शेतीपंप असणाऱ्या शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. पाटण तालुक्याने संपूर्ण राज्याला उजेडात आणले आहे. असे असताना येथेच समस्यांचा ससेमिरा का? असा प्रश्न पडला आहे. वीजवितरण कंपनीने ऐन सणासुदीच्या काळात शेतीपंप ग्राहकांस वीजबिलाचा अजब बोनस देऊन बळीराजाचं दिवाळंच काढलं आहे. शेतीपंप मालकांना विना रिडिंगचे भरमसाठ बिले देऊन ग्राहकांचं कंबरडंच मोडलं आहे. आता याचीच चर्चा परिसरात ऐकावयास मिळत आहे. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी वीजवितरणच्या आधिकाऱ्याला धारेवर धरले. शेतकऱ्यांच्या सह्यांचे निवेदन उंब्रजच्या वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनाही दिले आहे. वीजवितरण कार्यालयाचा ग्राहकांना लोकाभिमुख सेवा देण्याचा मानस आसताना ग्राहकांना कायम त्रासच नशिबी आला आहे. दरमहा येणारे विजबिले भरतोय तोवर दुसरे हातात पडत असते. भरमसाठ येणाऱ्या वीजबिलामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य ग्राहक मेटाकुटीला आला आहे. कर्मचाऱ्याचा बेजबाबदारपणा, वीजबिल दुरुस्ती करताना ग्राहकांना होणारा त्रास पहिलं वेळेत भरलंय तरी दुसरं बिल घरी पोहोच, आशा एक ना अनेक संकटात शेतकऱ्यासंह सामान्य ग्राहक सापडला आहे. (वार्ताहर) कसला हा कारभार ? वीजवितरणचे कर्मचारी तर मीटर बदलणे, मीटर शिफ्टिंग करणे, नवीन कनेक्शनसाठी व पैशासाठी विनाकारण ताटकळत ठेवणे. यासाठी भरमसाठ पैशाची मागणी करून ग्राहकांची लूटमार करत आहेत. ठेकेदाराला वीजबिल रिडिंगचा ठेका संबंधित विभाग देत आहे. त्यांच्याकडूनच नियमांची पायमल्ली होत आहे. कर्मचारी व ठेकेदार यांच्यात तडजोडीच्या चर्चा तर कायम ऐकावयास मिळत असतात. मग याला वीजवितरणचा कसला कारभार म्हणायचा? असा प्रश्न उपस्थित होत आहे.