शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

शासनाच्या प्रयोगात शेतकरी भूमिहीन -- : डॉ. भारत पाटणकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 23:55 IST

क-हाड येथील विमानतळाचा विस्तार करून शासन काय साधणार आहे? उलट पुसेगाव परिसरात मुबलक जागा उपलब्ध होईल. तिथे विमानतळ उभारावे. - डॉ. भारत पाटणकर, अध्यक्ष, श्रमिक मुक्ती दल

ठळक मुद्देक-हाडचे विमानतळ गिळणार सुपीक जमिनी

सागर गुजर ।कोल्हापुरात असलेल्या विमानतळाचा किती उपयोग होतो, हे सर्वांनाच माहीत आहे, आता कºहाडातील विमानतळ विस्ताराचा आग्रह अनाठायी आणि अशास्त्रीय असाच आहे. या निर्णयामुळे अनेक शेतकरी भूमिहीन होतील. सुपीक जमिनी वाया जातील, शासनाने विमानतळ विस्तार रद्द करणे गरजेचे आहे.

प्रश्न : क-हाडच्या विमानतळ विस्ताराला आपला विरोध का आहे?उत्तर : क-हाड येथील विमानतळ अशास्त्रीय आहे. एका बाजूला आगाशिवनगरचा डोंगर आहे, तर दुसऱ्या बाजूला इलेक्ट्रिसीटीचे केंद्र, या ठिकाणी विमान उतरवणे धोकादायक आहे. या परिस्थितीत मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. या परिसरातील रहिवाशांच्या डोक्यावरही मोठे संकट उभे राहिलेले आहे.

प्रश्न : शेतकऱ्यांचे नुकसान काय होईल, असे वाटते?उत्तर : वारुंजी, मुंढे, केसे, पाडळी या गावांतील शेतकºयांच्या जमिनी विविध कारणांनी यापूर्वीच संपादित केल्या आहेत. वारुंजीचे गावठाण उठवताना त्यांना जमिनी द्याव्या लागल्या होत्या. कोयना प्रकल्पग्रस्तांसाठी जमिनी द्याव्या लागल्या. क-हाड-चिपळूण महामार्गाच्या कामातही जमिनी गेल्या आहेत. अनेकजण उरलेल्या अर्ध्या एकरात उसासारखे नगदी पीक घेऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहेत. या शेतकºयांच्या जमिनी विमानतळाच्या विस्तारासाठी घेतल्या तर शेतकरी भूमिहीन होतील, ही भीती आहे.

प्रश्न : जमिनीच्या बदल्यात पैसे दिल्यास तो तोडगा मान्य होईल का?उत्तर : जमिनीच्या बदल्यात पैसे घेतलेल्या वांग-मराठवाडी प्रकल्पग्रस्तांचे काय हाल झाले, हे सर्वांना माहीत आहे. पैसे जास्त काळ टिकत नसतात. चरितार्थ चालविण्यासाठी जमीन लागते. ती कसूनच पुढच्या पिढ्या तगू शकतात, त्यामुळे कितीही पैसे मिळाले तरी ९९ टक्के लोकांना ते नको आहेत. विमानतळाचा विस्तारच लोकांना नको आहे, हवे तर पुसेगाव, निढळच्या माळरानावर ते उभारावे, क-हाडात नको.बैठकीकडे लागल्या नजराक-हाड येथील विमानतळ विस्तारप्रश्नी मुख्यमंत्र्यांसोबत लवकरच बैठक होणार आहे. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी यांनी आंदोलकांना आश्वासन दिले आहे. आता या बैठकीकडे वारुंजी, मुंढे, केसे, पाडळी या गावांतील बाधित शेतकºयांच्या नजरा या लागून राहिल्या आहे. अपेक्षित निर्णय झाला नाही तर आंदोलन तीव्र होणार आहे.तीन वेळा गेल्या हक्काची जमिनी

कृषी महाविद्यालय, महावितरणचा प्रकल्प, कºहाड-चिपळूण महामार्ग, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय तसेच कोयना प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी पूर्वीच या शेतकºयांच्या जमिनी संपादित केल्या आहेत. येथील शेतकरी आधीच अल्पभूधारक बनले आहेत. कमी जमिनीत कष्ट करून येथील शेतकरी उदरनिर्वाह करत आहेत. आता विमानतळासाठी जमीन घेतल्यास उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होईल.

टॅग्स :AirportविमानतळDamधरण