शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

Satara: गोव्यातील ८४ लाखांची बनावट विदेशी दारू जप्त, दोघांना अटक; गुजरातला पोहोचवायची होती दारू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 14:26 IST

सातारा : गोव्याहून तब्बल ८४ लाख ४१ हजारांची बनावट विदेशी दारूची तस्करी ट्रकमधून करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखा व ...

सातारा : गोव्याहून तब्बल ८४ लाख ४१ हजारांची बनावट विदेशी दारूची तस्करी ट्रकमधून करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखा व उत्पादन शुल्कच्या पथकाने अटक केली. ही कारवाई मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास बोरगाव (ता. सातारा) गावच्या हद्दीत करण्यात आली.ट्रकचालक सचिन विजय जाधव (वय ३५, रा. खानापूर, सांगली), मालक जमीर हरुण पटेल (४५, रा. आगाशिवनगर, मलकापूर, कऱ्हाड), अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रकचालक सचिन जाधव हा दारूचा माल घेऊन गोव्यावरून गुजरातला जात आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांना मिळाली. त्यांनी तातडीने उत्पादन शुल्कचे निरीक्षक माधव चव्हाण, सहायक पोलिस निरीक्षक धोंडिराम वाळवेकर, रोहित फार्णे, पोलिस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांच्या पथकाला याची माहिती दिली. या पथकाने बोरगाव (ता. सातारा) गावच्या हद्दीतील महामार्गालगत असलेल्या उरमोडी नदीजवळ पहाटे तीन वाजता सापळा लावला. गोव्यावरून ट्रक बोरगावजवळ येताच पथकाने ट्रक अडवला. ट्रकचालक सचिन जाधव हा एकटाच ट्रकमध्ये होता. त्याच्याकडे ट्रकमधील मालाबाबत चाैकशी करून पोलिसांनी ट्रकची तपासणी केली. त्यावेळी ट्रकमध्ये गोव्यावरून आणलेली विविध कंपनीची ८४ लाख ४१ हजार ४० रुपयांची ही बनावट दारू आढळून आली. सातारा जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात बनावट दारू जप्त करण्याची ही पहिलीच वेळ आहे. पोलिसांच्या पथकाने ट्रक चालक सचिन जाधव याच्याकडे चाैकशी केल्यानंतर त्याने हा माल जमीर पटेल याचा असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी पटेल याला कऱ्हाडमधून अटक केली. हा दारूचा बनावट माल गुजरातला कोणाकडे देणार होते, याचा पोलिस कसून तपास करीत आहेत.हवालदार अतीश घाडगे, साबीर मुल्ला, अमोल माने, शरद बेबले, अमित सपकाळ, प्रवीण फडतरे, जयवंत खांडके आदींनी या कारवाईत भाग घेतला.

यामुळे दारू बनावट समजलं..उत्पादन शुल्कचे निरीक्षक माधव चव्हाण यांनी गोव्यावरून आणलेली ही दारू बनावट असल्याचे सांगितले. संबंधित दारूच्या बाटल्यांवर कोणत्याही कंपनीचे लेबल नव्हती. तसेच बाटलीतील दारूची ४२.८ची स्ट्रेंथ नव्हती. त्यामुळे ही दारू बनावट असल्याचे तपासणीत समोर आले. काही बाॅक्समधील दारूची स्ट्रेंथ ३६ तर काहींची ४० आढळून आली. या दारूची किंमत ८४ लाख तर ट्रकची किंमत १६ लाख ५० हजार आहे, असा एकूण एक कोटी ९१ लाखांचा मुद्देमाल या कारवाईत पोलिसांनी हस्तगत केला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीExcise Departmentउत्पादन शुल्क विभाग