शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

आठवणींनी पाणावले सर्वांचेच डोळे

By admin | Updated: November 28, 2015 00:10 IST

पवारवाडी शाळेचा उपक्रम : माजी विद्यार्थी मेळाव्याने जुन्या आठवणींना उजाळा

कुडाळ : कर्मवीर भाऊराव पाटील व माजी मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमित शनिवारी जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. ओढा-टेकडी फोडून श्रमदान करणाऱ्या तसेच स्वत:ची जमीन शाळेसाठी दान करणाऱ्यांच्या आठवणींनी अनेकांचे डोळे पाणावले. निमित्त होते माजी विद्यार्थी स्रेहमेळाव्याचे.रयतच्या पवारवाडी (ता. जावली) येथील न्यू इंग्लिश स्कूल शाळेत माजी विद्यार्थी मेळावा दिमाखात झाला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक शहाजी कदम होते. आसू अन् हसूचे दर्शन घडवणाऱ्या मेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी मुख्याध्यापक व शिक्षकांना निमंत्रित केले होते. यामध्ये व्ही. वाय. पाटील, पिसाळ सर, कुरळे सर, जे. बी. सावंत, बी. के. पाटील, एम. डी. जाधव, सुरेश पवार, वसंतराव दुदुस्कर, व्ही. बी. गायकवाड, दुदुस्कर सर, एम. के. सोनावणे, व्ही. एम. जाधव, पी. के. भोसले, डी. एल. तुपे, ढोणे , खरे, कारंडे, मोरे, पी. एम. पाटील, विजयराव माने, पी. व्ही. दुदुस्कर, कदम, व्ही. एस. जगताप यांची उपस्थिती होती. विष्णू करंजकर यांच्या बहारदार सूत्रसंचालनाने स्रेहमेळाव्याची मजा उत्तरोत्तर वाढतच राहिली.जहांगिर पठाण यांनी प्रास्तविकात माजी विद्यार्थी स्रेहमेळाव्या पाठामागीचा उद्देश स्पष्ट केला. दीपक पवार यांनी आभार मानून हा मेळावा दरवर्षी भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी होणार असल्याचे जाहीर केले. (प्रतिनिधी)पळून गेलेले शिक्षक रमले १८ वर्षे कोल्हापूरहून बदली झालेले ढोणे सर पवारवाडीला आले. परंतु त्यांना शाळाच सापडली नसल्याने ते पुन्हा रयत संस्थेत गेले व त्यांनी विनवणी केली की मला दुसरी शाळा द्या. पण संस्थेने नकार देत पुन्हा पवारवाडीला पाठवले. तेंव्हा त्यांचे स्वागतही पळून गेलेले शिक्षक म्हणूनच झाले. परंतु ग्रामस्थांकडून मिळालेले प्रेम, आपुलकी यामुळे ते पवारवाडी शाळेत १८ वर्षे रमले. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण त्यांना ‘पप्पा’ या नावानेच आजही हाक मारतात. कित्येकदा या गावची आठवून काढून ढोणे सरांचे डोळे पानावले आहेत. आपल्या घरापासून लांब राहुनही कायम कुटूंबात असण्याचा मानसिक आधार या गावाने दिला आहे.