शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
3
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

शहरात हवेची गुणवत्ता तपासणी यंत्रणा सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:51 IST

वाई : राज्यात पर्यावरण वातावरणातील बदल विभागामार्फत ऑक्टोबर २० ते मार्च २१ या सहा महिन्यांच्या कालावधीत माझी वसुंधरा अभियान ...

वाई : राज्यात पर्यावरण वातावरणातील बदल विभागामार्फत ऑक्टोबर २० ते मार्च २१ या सहा महिन्यांच्या कालावधीत माझी वसुंधरा अभियान राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राबविण्यात येत आहे. या अभियानामध्ये पर्यावरण रक्षणाच्या अनुषंगाने पृथ्वी, जल, अग्नी, आकाश, वायू या निसर्गाशी संबंधित पंचतत्त्वांवर आधारित उपाययोजना करून शाश्‍वत निसर्गपूरक जीवनपद्धती अवलंबिण्यासाठी विविध कामे करण्यात येत आहेत. वाई नगरपरिषदेमार्फत देखील या अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे.

शहरातील वायू गुणवत्ता नियंत्रणात राहण्यासाठी विविध उपाययोजना तसेच जनजागृती कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत. या अभियानांतर्गत वृक्षारोपण, सार्वजनिक उद्याने व विविध ठिकाणांचे संवर्धन, घनकचरा व्यवस्थापन, हवेच्या गुणवत्ता देखरेखीसाठी शहरात प्रणाली बसविणे, सायकल, ई-मोटार वाहन रॅली काढणे, शहरातील धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी शहरात हरित आच्छादन वाढविणे, नाल्याच्या तोंडाशी जाळ्या बसविणे, पाण्याच्या स्त्रोतांचे इको रिस्टोरेशन करणे, नदीमध्ये ठिकठिकाणी इको ब्रिजेस बांधणे आदी कामे करण्यात येणार आहेत.

निसर्गाशी संबंधित असलेल्या या उपक्रमाचा भाग म्हणून शहरातील वायू प्रदूषणाची तपासणी केली जात आहे. यासाठी वाई नगरपरिषदेमार्फत शहरात हवेची गुणवत्ता तपासणी यंत्रणा बसविण्यात आली आहे. शहराचा निवासी भाग, बाजारपेठ भाग आणि घनकचरा प्रकल्प केंद्र अशा ३ ठिकाणी ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. यामुळे शहरातील प्रदूषणाचे मोजमाप करणे शक्य होणार असून, या यंत्रणेमुळे हवेत कोणकोणते प्रदूषणकारक घटक आहेत. त्यांचे प्रमाण किती आहे. याची माहिती मिळणार आहे. त्याचबरोबर हे घटक कोणत्या कारणामुळे हवेत येतात ही माहितीदेखील घेणे शक्य होणार आहे. या माहितीच्या मदतीने हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी विविध उपाययोजना करण्याचे योजणार आहे. शहरातील हवेचा सुधारलेला पोत ही बाब समस्त वाईकरांसाठी आल्हाददायी ठरणार आहे. त्यासाठी नागरिकांनी देखील आपले योगदान देणे आवश्यक आहे.

(चौकट)

माझी वसुंधरा अभियानाची अंमलबजावणी वाई नगरपरिषदेमार्फत करण्यात येत असून, वाईकरांनी यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवून अभियान यशस्वी करण्यासाठी आणि शहराचे आरोग्य चांगले राहण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे.

- विद्यादेवी पोळ, मुख्याधिकारी

फोटो २६वाई

वाई शहरातील वायू गुणवत्ता तपासणी यंत्रणासमवेत पालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होेते.