शहरं
Join us  
Trending Stories
1
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
2
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
3
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
4
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
5
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
6
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
7
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
8
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
9
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
10
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
11
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
12
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
13
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
14
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
15
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
16
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
17
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
18
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
19
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
20
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल

उडी मारून अभियंत्याची आत्महत्या

By admin | Updated: March 11, 2017 22:31 IST

मध्यवर्ती बसस्थानकाजवळील घटना : इमारतीच्या सुमारे शंभर फुटांवरुन स्वत:ला दिले झोकून

सातारा : बसस्थानकाशेजारील एका इमारतीवरून उडी टाकून संतोष गोपाळ कांबळे (वय ३९, रा. सिद्धार्थनगर करमाळा, जि. सोलापूर) या अभियंत्याने शनिवारी सकाळी सात वाजता आत्महत्या केली. या घटनेमुळे बसस्थानक परिसरात खळबळ उडाली असून, बेरोजगाराला कंटाळून त्यांनी हे कृत केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.‘मला नोकरी लागली आहे,’ असे सांगून संतोष कांबळे हे गेल्या चार दिवसांपूर्वी घरातून निघून आले होते. शनिवारी सकाळी सहाच्या सुमारास ते बसस्थानक परिसरातून फिरत असल्याचे काही नागरिकांनी पाहिले असल्याचे समोर आले आहे. बसस्थानकातून ते चालत पोवई नाका येथे गेले. त्यानंतर पुन्हा परत ते बसस्थानकाकडे आले. बसस्थानकाशेजारी इमारतीसमोर एका दुकानाचे उद्घाटन होते. या ठिकाणी ते काहीवेळ थांबले. त्यानंतर जिन्यावरून इमारतीवर गेले. टेरेसच्या कडठ्यावर उभे राहून त्यांनी तेथून उडी मारली. ज्या ठिकाणी दुकानाच्या उद्घाटनाची लगबग सुरू होती. नेमकी त्याच ठिकाणी त्यांनी उडी मारली. मोठा आवाज आल्याने रस्त्यावरील भाजी विक्रेत्यांनी धाव घेतली. संतोष कांबळे यांच्या कानातून आणि डोक्यातून रक्तस्त्राव सुरू झाला. काही नागरिकांनी रुग्णवाहिका आणि पोलिसांना याची माहिती दिली. तोपर्यंत नागरिकांनी संतोष कांबळे यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती चिंताजनक बनल्याने त्यांना पुणे येथे हलविण्यात आले. दुपारी बारा वाजता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.पोलिसांनी त्यांचे खिसे तपासले असता त्यांच्या खिशामध्ये चिठ्ठी सापडली. त्यामध्ये त्यांनी ‘मी वेडा आहे. म्हणून मी आत्महत्या करत आहे,’ असा उल्लेख आहे. मात्र, त्यांच्या नातेवाइकांनी पोलिसांना वेगळीच माहिती दिली आहे. संतोष कांबळे यांनी मॅकॅनिकल इंजिअनरची पदवी घेतली होती. काही वर्षे त्यांनी काम केले. मात्र, नंतर ते घरीच होते. नोकरीच्या शोधात इतरत्र ते फिरत होते. घरातून जातानाही त्यांनी मला नोकरी लागल्याचे सांगितले होते. हाताचा पंजा उमटला !संतोष कांबळे यांनी इमारतीवरून उडी टाकल्यानंतर दुसऱ्या मजल्यावर त्यांच्या हाताचे ठसे उमटले असल्याचे दिसून येत आहे. तेथून पुन्हा ते सुमारे शंभर फुटांवरून खाली पडले. त्यामुळे त्यांच्या डोक्याला आणि हातापायाला गंभीर जखम झाली.५आत्महत्या करण्यापूर्वी गावकऱ्यांना फोन !संतोष कांबळे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी करमाळा येथील आपल्या गावकऱ्यांना फोन केल्याचे पुढे आले आहे. ‘मी एक-दोन दिवसांत गावी येणार आहे,’ असे त्यांनी सांगितले होते. मात्र, अचानक त्यांनी हा निर्णय घेतल्याने गावकऱ्यांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे.