उपकरप्राप्त इमारतीच्या जागेवर अतिक्रमण

By Admin | Updated: July 15, 2014 01:07 IST2014-07-15T01:07:56+5:302014-07-15T01:07:56+5:30

शासनाच्यानिश्चित धोरणाअभावी शहरातील रखडलेल्या २९५ उपकरप्राप्त इमारती व त्या ठिकाणच्या मोकळ्या जागा अतिक्रमणाच्या विळख्यात अडकलेल्या आहेत

Encroachment in place of cessed building | उपकरप्राप्त इमारतीच्या जागेवर अतिक्रमण

उपकरप्राप्त इमारतीच्या जागेवर अतिक्रमण

फलटण : फलटण पालिकेच्या नगराध्यक्षपदी सारिका जाधव यांची तर उपनगराध्यक्षपदी पांडुरंग गुंजवटे यांची सोमवारी अधिकृतरीत्या निवड जाहीर करण्यात आली.
फलटण नगरपालिका सभागृहातील सभेत पिठासन अधिकारी म्हणून प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव तर सहायक म्हणून मुख्याधिकारी यशवंत डांगे उपस्थित होते. नगराध्यक्षपदासाठी दि. ९ रोजी एकमेव सारिका जाधव यांचाच अर्ज आल्याने त्यांची निवड निश्चित होती. आज उपनगराध्यक्षपदासाठी पांडुरंग गुंजवटे यांचाच अर्ज आल्यानंतर पिठासन अधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी नगराध्यक्षपदी सारिका जाधव, उपनगराध्यक्षपदी पांडुरंग गुंजवटे यांच्या नावाची घोषणा करून त्यांचा सत्कार केला. नगराध्यक्षपद महिलांसाठी राखीव होते.
निवडीनंतर नगराध्यक्षा सारिका जाधव यांची भव्य मिरवणूक कढण्यात आली. पांडुरंग गुंजवटे नगरपालिकेत ज्येष्ठ नगरसेवक असून, यापूर्वी त्यांनी नगराध्यक्षपदही भूषविले आहे. नगरपालिकेवर राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष रामराजे नाईक-निंबाळकर यांची एकहाती सत्ता आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Encroachment in place of cessed building