शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

वाई परिसरातील सेवा रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:12 IST

वाई : वाई शहरामधून कृष्णामाई वाहाते तर शहराच्या दोन्ही बाजूने धोम धरणाचे डावा व उजवा कालवा वाहतो. नागरी वस्तीमधून ...

वाई : वाई शहरामधून कृष्णामाई वाहाते तर शहराच्या दोन्ही बाजूने धोम धरणाचे डावा व उजवा कालवा वाहतो. नागरी वस्तीमधून जाणाऱ्या कालव्यामध्ये सुशिक्षित नागरिकही कालवा म्हणजे कचरा टाकण्याचे हक्काचे ठिकाण असल्याप्रमाणे कलव्यामध्ये कचरा टाकत असतात. त्यामुळे दोन्ही कालव्यांसह सेवा रस्त्यावर घाणीचे साम्राज्य पसरले आहे.

वाई शहरातील दत्तनगर ते सह्याद्रीनगर या भागात यशवंतनगर ग्रामपंचायत हद्दीतून जाणाऱ्या धोम उजव्या कालव्यामध्ये तसेच कालव्याच्या शेजारून जाणाऱ्या सेवा रस्त्यावर परिसरातील नागरिक प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये भरून कचरा, प्लास्टिक, घरात छोटे-कार्यक्रम झाल्यास पत्रावळ्या नियमित येणाऱ्या घंटागाडीत न टाकता कालवा परिसरात टाकतात. यामुळे परिसराला बकाल स्वरूप येऊन दुर्गंधी पसरत आहे. प्लास्टिक खाल्ल्याने पाळीव जनावरांनाही धोका निर्माण झाला असून, काही ठिकाणी संध्याकाळच्या वेळेस मद्यपी बसत असल्यामुळे नागरिकांना त्रास होऊन परिसरात काचा व प्लास्टिकचे साम्राज्य होत असते. सकाळी, संध्यकाळी या परिसरात नागरिक फिरण्यासाठी येत असतात. त्यांनाही नाहक त्रास सहन करावा लागतो. यामुळे परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तरी ग्रामपंचायतीने कचरा उचलावा व अशा प्रकारे कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

राज्यासह देशात आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर असताना वैयक्तिक स्वच्छतेबरोबर सार्वजनिक स्वच्छता ही महत्त्वाची आहे. त्यानुसार शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कचऱ्याची विल्हेवाट लावण्याविषयी आचारसंहिता दिली आहे. ओला कचरा व सुका कचरा वेगळा करून त्यावर प्रक्रिया करण्यात यावी, जेणेकरून कचऱ्यामुळे होणारे प्रदूषण बंद होऊन आरोग्यास धोका पोहोचू नये. यासाठी ठराविक वेळेत ग्रामपंचायतीकडून कचरा गाड्या फिरत असून, त्यामध्येच नागरिकांनी कचरा टाकावा. सार्वजनिक स्वच्छता राखणे हे प्रशासनाबरोबर नागरिकांचे कर्तव्य आहे. याचा नागरिकांना सोयीस्कररित्या विसर पडताना दिसत आहे. तरी अशा बेशिस्तपणे कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.

कोट..

दत्तनगर ते सह्याद्रीनगर या परिसरातून जाणाऱ्या धोम उजव्या कालव्यामध्ये स्वतःला सुशिक्षित म्हणणारी लोक ही सर्रास कचरा टाकतात. यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य झाल्याने परिसरात दुर्गंधी पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच मद्यपींचा उपद्रवही वाढला आहे. नागरिकांनी घंटागाडीमध्ये कचरा टाकावा. यशवंतनगर ग्रामपंचायतीने डोळेझाक न करता संबंधित नागरिकांवर कडक कारवाई करावी.

-विकास सावंत, नागरिक, यशवंतनगर

फोटो आहे..

३१वाई

वाई परिसरातील सेवा रस्त्यासह धोम धरणाचे डावा व उजवा कालव्यात घाणीचे साम्राज्य पसरले आहे.