घरात एकटी होती अकरा वर्षाची चिमुकली, जवळच्या नातलगानेच केला अत्याचार; साताऱ्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2022 16:21 IST2022-03-02T16:13:38+5:302022-03-02T16:21:25+5:30

सायंकाळी आई घरी आल्यानंतर पीडित मुलीने आपल्यावर ओढावलेला प्रसंग आईला सांगितला

Eleven year old girl was alone in the house, tortured by a close relative; Incidents in Satara | घरात एकटी होती अकरा वर्षाची चिमुकली, जवळच्या नातलगानेच केला अत्याचार; साताऱ्यातील घटना

घरात एकटी होती अकरा वर्षाची चिमुकली, जवळच्या नातलगानेच केला अत्याचार; साताऱ्यातील घटना

सातारा : अकरा वर्षाची मुलगी घरात एकटी असताना तिच्याच अगदी जवळच्या नातलगाने चिमुरडीवर जबरदस्तीने अत्याचार केला. ही खळबळजनक घटना सातारा शहरातील एका उपनगरात काल, मंगळवारी (दि. १) उघडकीस आली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पीडित मुलीच्या आईने सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, या महिलेच्या नंणदेच्या २२ वर्षीय मुलाने हे घृणास्पद कृत्य केले आहे. त्यांची अकरा वर्षांची मुलगी मंगळवारी घरात एकटीच होती. त्यावेळी नणंदेचा मुलगा घरात गेला. त्याने दरवाजा लावल्यानंतर चिमुकलीवर जबरदस्तीने अत्याचार केला.

सायंकाळी आई घरी आल्यानंतर पीडित मुलीने आपल्यावर ओढावलेला प्रसंग आईला सांगितला. तेव्हा आईच्या पायाखालची जमीनच सरकली. संबंधित मातेने तातडीने सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन आपल्या मुलीसोबत घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला.

त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीच्या शोधासाठी पथके पाठविली. मात्र, संबंधित युवक पोलिसांच्या हाती लागला नाही. या प्रकारामुळे साताऱ्यासह संबंधित उपनगरात संतापाची लाट उसळली आहे. सहायक पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी पीडित महिलेच्या घरी जाऊन या प्रकाराची माहिती घेतली. आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी, यासाठी योग्य पुरावे गोळा करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

Web Title: Eleven year old girl was alone in the house, tortured by a close relative; Incidents in Satara