परीक्षेवेळी दहावीचे दोन डमी विद्यार्थी सापडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 12:11 IST2020-03-16T12:09:19+5:302020-03-16T12:11:48+5:30
पाचगणी आणि साताऱ्यामध्ये दहावीचे दोन डमी विद्यार्थी सापडले असून, रात्री उशिपर्यंत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

परीक्षेवेळी दहावीचे दोन डमी विद्यार्थी सापडले
ठळक मुद्देपरीक्षेवेळी दहावीचे दोन डमी विद्यार्थी सापडलेदोन्ही गुन्हे पोलीस ठाण्यात दाखल
सातारा : पाचगणी आणि साताऱ्यामध्ये दहावीचे दोन डमी विद्यार्थी सापडले असून, रात्री उशिपर्यंत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
याबाबत अधिक माहिती अशी, दहावीच्या परीक्षेचा शनिवारी भूमितीचा पेपर होता. या परीक्षेवेळी केंद्र संचालक प्रत्येक वर्गात जाऊन विद्यार्थ्यांजवळील कॉपी तपासत होते. त्यावेळी साताऱ्यातील एका शाळेत डमी विद्यार्थी परीक्षेला बसला असल्याचे निदर्शनास आले.
तर दुसरा विद्यार्थी पाचगणीतील शाळेत सापडला आहे. हे दोन्ही गुन्हे रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.