दुर्गादेवी आगमन मिरवणूक विनापरवाना काढली, साताऱ्यात १४ जणांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 19:09 IST2025-09-23T19:09:12+5:302025-09-23T19:09:44+5:30
सातारा : दुर्गादेवी आगमन मिरवणुकीसाठी कोणतीही परवानगी न घेता ढोल-ताशे वाद्यांसह मिरवणूक काढणाऱ्या दोन मंडळांच्या १४ कार्यकर्त्यांवर आदेशाचे उल्लंघन ...

दुर्गादेवी आगमन मिरवणूक विनापरवाना काढली, साताऱ्यात १४ जणांवर गुन्हा
सातारा : दुर्गादेवी आगमन मिरवणुकीसाठी कोणतीही परवानगी न घेता ढोल-ताशे वाद्यांसह मिरवणूक काढणाऱ्या दोन मंडळांच्या १४ कार्यकर्त्यांवर आदेशाचे उल्लंघन झाल्याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस हवालदार धीरज मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सदर बझार येथे दि. १९ रोजी रात्र सव्वाअकराच्या सुमारास रोहित श्रीकांत शितोळे, भिकाजी वामन शिंदे, अक्षय राजेंद्र माळवदे, संजय रामचंद्र मेथा, योगेश विनायक तारळकर, विशाल कोळी (सर्व रा. सदर बझार, सातारा) यांनी विनापरवाना आगमन मिरवणूक काढली. आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
तसेच सदर बझार येथेच विनापरवाना मिरवणूक काढल्याप्रकरणी हवालदार विश्वनाथ मेचकर यांनी फिर्याद दिली आहे. यानुसार अजित नंदकुमार भूतकर, तुषार सत्यवान आवळे, सिद्धेश महादेव किर्दत, अक्षय दत्तात्रय शिंदे, अजिंक्य सुधाकर संकपाळ, निखिल मोहन रजपुत, मंगेश डहाणे, गणेश हणमंत भोसले (सर्व रा. सदर बझार, सातारा) यांच्यावर आदेशाचे उल्लंघन झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.