शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
5
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
6
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
7
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
8
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
9
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
10
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
11
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
12
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
13
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
14
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
15
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
16
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
17
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
18
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
19
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
20
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
Daily Top 2Weekly Top 5

शिरवळ येथे डंपर-टेम्पोची धडक; एक जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:41 IST

शिरवळ : आशियाई महामार्ग ४७ वरील शिरवळ गावच्या हद्दीमध्ये लॉकीम फाट्यालगत डंपर व टेम्पोच्या झालेल्या जोरदार धडकेमध्ये व्हॅनचे मोठ्या ...

शिरवळ : आशियाई महामार्ग ४७ वरील शिरवळ गावच्या हद्दीमध्ये लॉकीम फाट्यालगत डंपर व टेम्पोच्या झालेल्या जोरदार धडकेमध्ये व्हॅनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, टेम्पोचालक गंभीर जखमी झाला आहे. यामध्ये टेम्पोचालक हणमंत दिनकर मांगे (वय ३१, रा. वडगाव शेरी, पुणे) असे गंभीर जखमी झालेल्या टेम्पोचालकाचे नाव आहे.

याबाबतची शिरवळ पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, वडगाव शेरी येथून भीमराव वाघ यांच्या मालकीचा टेम्पो (एमएच-१२-पीक्यू-६९५७) मधून सुरूर येथील डीमार्ट या ठिकाणी आटा खाली करण्याकरिता टेम्पोचालक हणमंत मांगे हे आले होते. ते खाली केल्यानंतर परत पुणे बाजूकडे जाताना टेम्पो हा शिरवळ, ता. खंडाळा गावच्या हद्दीमधील लॉकीम फाट्याजवळ आला असता त्या ठिकाणी अचानक डंपर (एमएच-११-सीएच-६८८१) याचे टायर फुटल्याने महामार्गावरच डंपर थांबल्याने टेम्पोची पाठीमागून डंपरला जोरदार धडक बसली.

ही धडक एवढी जोरदार होती की टेम्पोचे नुकसान होऊन टेम्पोचालक हणमंत मांगे हे गंभीर जखमी झाले. याबाबतची माहिती मिळताच शिरवळ पोलिसांनी गंभीर जखमी टेम्पोचालक हणमंत मांगे यांना शिरवळ येथील खासगी रुग्णालयामध्ये दाखल केले.

या घटनेची फिर्याद हणमंत मांगे यांनी शिरवळ पोलीस स्टेशनला दिली असून, अधिक तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक रमेश वळवी हे करीत आहे.