यवतेश्वर घाटात ब्रेक फेल झाल्याने भरधाव डंपरला अपघात, चालकाचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2023 21:48 IST2023-04-15T21:47:28+5:302023-04-15T21:48:14+5:30
शिवशंकर संभाजी भोसले (वय ३०, मूळ रा. ओस चालबुगी, जि. लातूर) असे अपघातात मृत्यू झालेल्या चालकाचे नाव आहे.

यवतेश्वर घाटात ब्रेक फेल झाल्याने भरधाव डंपरला अपघात, चालकाचा जागीच मृत्यू
सातारा : सातारा-कास मार्गावर यवतेश्वर घाटाच्या उतारावर ब्रेक फेल झाल्याने भरधाव डंपर डोंगराला धडकला. या अपघातात डंपरचालकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी दुपारी दोन वादताच्या सुमारास घडला. शिवशंकर संभाजी भोसले (वय ३०, मूळ रा. ओस चालबुगी, जि. लातूर) असे अपघातातमृत्यू झालेल्या चालकाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शिवशंकर भोसले हा डंपर (एमएच ११ बीएल २६८०) चालवत यवतेश्वर घाटातून साताऱ्यात येत होता. पावर हाऊसजवळ आल्यानंतर त्याच्या डंपरचा ब्रेक फेल झाला. डाव्या बाजूला दरी तसेच काही घरे असल्यामुळे शिवशंकर याने डंपर डोंगराला धडकविला. हा डंपर उतारावर असल्यामुळे डंपरचा वेग वाढला. त्यामुळे डोंगराला डंपर जोरदार धडकला. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात झाला. त्यावेळी बामणोलीहून रुग्णवाहिका येत होती. त्या रुग्णवाहिकेतून शिवशंकर याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी घोषित केले. सातारा तालुका पोलिस ठाण्यात या अपघताची रात्री उशिरापर्यंत नोंद झाली नव्हती.