संतोषला धक्काबुक्की होण्याच्या शक्यतेमुळे गावात प्रचंड बंदोबस्त

By Admin | Updated: August 20, 2016 01:00 IST2016-08-19T23:22:57+5:302016-08-20T01:00:59+5:30

पोलिसांकडून खबरदारी : लक्ष वेधून घेण्यासाठी म्हणे काहीजण तयारीत

Due to the possibility of Santosh being hit, there is huge settlement in the village | संतोषला धक्काबुक्की होण्याच्या शक्यतेमुळे गावात प्रचंड बंदोबस्त

संतोषला धक्काबुक्की होण्याच्या शक्यतेमुळे गावात प्रचंड बंदोबस्त

वाई : गेल्या सहा दिवसांपासून महाराष्ट्रभर गाजणाऱ्या वाई हत्याकांड प्रकरणातील आरोपी संतोष पोळ याच्याबद्दल प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. याचवेळी दुसरीकडे स्टंटबाजी करुन लोकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यासाठी काहीजण संतोषला धक्काबुक्की करण्याच्या तयारीत असल्याची कुणकूण लागताच पोलिसांनी शुक्रवारी धोम गावात प्रचंड बंदोबस्त ठेवला.
धोम धरण परिसरात वनिताचा मृतदेह सापडणार, याची चर्चा सुरु झाल्यानंतर प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी सकाळपासूनच वाई पोलिस ठाण्यात ठाण मांडून होते. मात्र, संतोषला नेमके कुठे ठेवले आहे, हे शेवटपर्यंत पोलिसांनी कुणाला समजू दिले नाही. आवारातील काही खोल्यांमध्ये पत्रकारांना मज्जाव करण्यात पोलिस निरीक्षक विनायक वेताळ हेच उलट अग्रेसर होते.
गेले सहा दिवस प्रसारमाध्यमातून झळकणारे पोलिस अधिकारी आज पत्रकारांपासून एवढे फटकून का वागू लागले, याचा शोध घेतला असता संतोषच्या बंदोबस्तासाठी पोलिसांनी आपली भूमिका बदलल्याची माहिती समजली. (प्रतिनिधी)

पोलिसांना भीती
नेमकी कुणाची ?
पोलिस ठाण्यात गर्दी होऊ लागली, तसे तोंडाला काळे फडके बांधलेल्या संतोषला जीपमध्ये बसवून मागच्या मागेच धोममध्ये नेण्यात आले. तेथेही खड्डा खणताना प्रसार माध्यमांना बिल्कूल जवळ येऊ दिले नाही. आजूबाजूच्या घरांच्या खिडक्याही झाकण्यात पोलिसांनी धन्यता मानली.

Web Title: Due to the possibility of Santosh being hit, there is huge settlement in the village