शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

Satara: दुष्काळी स्थिती; अनेक धरणांनी तळ गाठला, कोयनेत किती पाणीसाठा.. जाणून घ्या

By नितीन काळेल | Updated: April 6, 2024 16:58 IST

३१ मे पर्यंत या पाण्याचे नियोजन करावे लागणार

सातारा : जिल्ह्यात दुष्काळी स्थिती असून अनेक धरणांनी तळ गाठला आहे. पण, कोयना धरणात अजूनही ५१ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. ३१ मे पर्यंत या पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. तर सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनासाठी मागणी वाढल्याने कोयनेतून विसर्ग वाढवून तीन हजार क्युसेक करण्यात आला आहे.जिल्ह्यात गेल्यावर्षी पर्जन्यमान कमी झाले. वार्षिक सरासरीच्या ७० टक्क्यांहून अधिक पाऊस झाला. या अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यात दुष्काळी स्थिती निर्माण झालेली आहे. पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे सुमारे १५० गावे आणि ५०० हून अधिक वाड्यावस्त्यांना टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. तर कमी पर्जन्यमानामुळेच गेल्यावर्षी बहुतांशी धरणे भरली नव्हती. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजल्या जाणाऱ्या कोयना धरणाची पाणीसाठवण क्षमता १०५.२५ टीएमसी इतकी आहे. पण, या धरणातील पाणीसाठाही ९५ टीएमसीपर्यंतच पोहोचलेला. त्यामुळे यंदा टंचाई निवारणासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची मागणी वाढणार हे निश्चित होते. त्यानुसार नोव्हेंबर महिन्यापासूनच सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनासाठी पाणी मागणी होऊ लागली. त्यानुसार पाणी सोडण्यात येत आहे. सध्या एप्रिल महिना सुरू असलातरी कोयनेतून सांगलीसाठी विसर्ग सुरूच आहे.सांगलीसाठी आतापर्यंत धरणाच्या पायथा वीजगृहाची दोन युनिट सुरू ठेवून २१०० आणि आपत्कालीन द्वारमधून ४०० असा २५०० क्युसेक विसर्ग सुरू होता. पण, सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनासाठी मागणी आणखी वाढली. त्यामुळे शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास धरणाच्या आपत्कालीन द्वारमधून ९०० क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. परिणामी आता सांगलीसाठी आपत्कालीन द्वार ९०० आणि पायथा वीजगृह २१०० असा तीन हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. हे सर्व पाणी कोयना नदीतून जात आहे.जिल्ह्यात दुष्काळी स्थिती आहे. तरीही कोयना धरणात अजून ५१ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. तर गतवर्षी सुमारे ५५ टीएमसी पाणी धरणात होते. सध्या असणारा पाणीसाठा ३१ मे अखेरपर्यंत पुरवावा लागणार आहे.

कोयनेवर तीन सिंचन योजना अवलंबून..कोयना धरणातील पाण्यावर महत्त्वाच्या तीन सिंचन पाणी योजना अवलंबून आहेत. यामधील टेंभू योजनेचे पाणी साताऱ्यासह सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील सिंचनासाठी आहे. तर ताकारी आणि म्हैसाळ योजना सांगली जिल्ह्यासाठी आहेत. या दोन्हीही योजना मोठ्या आहेत. यासाठीही कोयनेतील पाण्याची तरतूद आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरdroughtदुष्काळDamधरणWaterपाणीKoyana Damकोयना धरण