शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
3
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
4
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
5
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
6
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
8
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
9
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
10
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
11
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
12
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
13
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
14
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
15
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
16
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
17
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
18
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
19
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
20
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

सैनिकांच्या घराचे स्वप्न होणार साकार...!

By admin | Updated: May 22, 2015 00:17 IST

गृहप्रकल्पाचे रविवारी भूमिपूजन : आजी-माजी सैनिकांना मिळणार स्वस्तात घरे

सातारा : सशस्त्र व अर्धबल सैनिकांना परवडणाऱ्या दरात घरे आणि इतर सुविधा मिळाव्यात, यासाठी रक्षक इन्फ्रास्ट्रक्चरच्या वतीने गृहप्रकल्प उभारण्यात येत आहेत. पुण्यात दोन आणि सोलापूरमधील गृहप्रकल्पाचे काम प्रगतिपथावर असतानाच साताऱ्यातील खिंडवाडी येथील सातारा पॉलिटेक्निकसमोर उभारण्यात येणाऱ्या ‘रक्षक कॉलनी’ या गृहप्रकल्पाचे भूमिपूजन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत रविवार, २४ मे रोजी सकाळी साडेदहा वाजता होणार असल्याची माहिती रक्षक संस्थेचे संचालक व अध्यक्ष विंग कमांडर तिरुमारन (निवृत्त) आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली.ते म्हणाले, ‘विश्वास पात्र आणि परवडणाऱ्या सुविधा सशस्त्र व अर्धबल सैनिकांना एकाच छत्राखाली उपलब्ध करून देण्याचा मुख्य हेतू डोळ्यासमोर ठेवून रक्षकची स्थापना मे २०१२ मध्ये करण्यात आली. सैनिकी कारकीर्दीमध्ये दुर्गम स्थानी राहणे आणि वारंवार बदल्यांच्या निमित्ताने देशभर फिरत राहणे, हे सर्व सैनिकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे सैनिक आपल्या भर तारुण्यात बराचसा काळ वेगवेगळ्या मिलिटरी कॅम्पसमध्ये कधी कुटुंबासोबत किंवा कधी कुटुंबाच्याशिवाय घालवतात. मिलिटरी कॅम्पसच्या वातावरणात त्यांच्या जीवनाला एक वेगळे वळण लागते व एका विशिष्ट प्रकारची जीवनशैली त्यांच्या अंगी रुजते. ही सर्व भटकंती करताना हे सर्व सैनिक आपल्या घरापासून, आपल्या समाजापासून आणि नातेवाइकांपासून नकळत दुरावले जातात. त्यामुळे निवृत्तीनंतर त्यांना परत गावी स्थायिक होतांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. ‘सैनिकांनी सैनिकांसाठी घेतलेला पुढाकार,’ या बीद्र वाक्याला व आपल्या मूळ ध्येयाला समोर ठेवून रक्षक इन्फ्रास्ट्रक्चर कार्य करत आहे. साताऱ्यातील खिंडवाडी येथे सातारा पॉलिटेक्निकच्या समोर सैनिकांसाठी नव्याने सुरू होणाऱ्या ‘रक्षक कॉलनी’ या गृहप्रकल्पाचे भूमिपूजन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून मराठी लाईफ इन्फंट्रीचे लेफ्टनंट जनरल डी. बी. शेकटकर (निवृत्त) हे असून, भूतपूर्व वायुसेना अध्यक्ष आणि सैनिक स्कूलचे माजी विद्यार्थी एअर चीफ मार्शल पी. व्ही. नाईक (निवृत्त) हे विशेष पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला कर्नल आर. डी. निकम सैनिक सहकारी बँकेचे चेअरमन कॅप्टन उदाजी निकम हेही उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास आजी, माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहनही तिरुमारन यांनी केले. हा गृहप्रकल्प जवळपास ११ एकर जागेवर उभा राहणार असून, यात ४५० घरे आहेत. बाजारभावांपेक्षा कमी दरात आणि सर्व सुख सुविधा असलेल्या हा गृहप्रकल्प असून आजी-माजी सैनिकांना एकाच ठिकाणी घरे मिळावेत, या उद्देशाने हा प्रकल्प उभा करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी ब्रिगेडियर सुनील माझगावकर (निवृत्त), बाला केशवन, बबन गोरे उपस्थित होते. (प्रतिनिधी)