कास तलावाच्या पाणीपातळीत कमालीची घट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:14 IST2021-02-21T05:14:29+5:302021-02-21T05:14:29+5:30

पेट्री सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास तलावाच्या पाणीपातळीत दिवसेंदिवस कमालीची घट होत असून, पाणीपातळी मोठ्या प्रमाणावर खालावू लागली आहे. ...

Dramatic drop in water level of Kas Lake! | कास तलावाच्या पाणीपातळीत कमालीची घट !

कास तलावाच्या पाणीपातळीत कमालीची घट !

पेट्री

सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास तलावाच्या पाणीपातळीत दिवसेंदिवस कमालीची घट होत असून, पाणीपातळी मोठ्या प्रमाणावर खालावू लागली आहे. तसेच सद्य:स्थितीत तलावात पंधरा फुटांपर्यंत पाणीसाठा शिल्लक आहे. शहराला पाणीपुरवठा करणारा कास तलावाचा पहिला व्हॉल्व्ह एक महिन्यापूर्वी पूर्णपणे उघडा पडला असून, सध्या दुसऱ्या व्हॉल्व्हद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. दरम्यान, तलावात नऊ फुटापर्यंत पाणीसाठा शिल्लक राहिल्यावर दुसरा व्हॉल्व्हदेखील उघडा पडला जातो.

कास तलावात किनाऱ्यालगत पंचवीस फुटांपर्यंत पाणीसाठा होतो. गतवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या उत्तरार्ध पंधरवड्यात सोळा फूट पाणीसाठा शिल्लक होता. यंदा आजमितीला सध्या ही पाणीपातळी पंधरा फुटांवर आली आहे. सातारा शहराला होत असलेल्या पाणीपुरवठ्यामुळे दर दिवसाला तलावातील पाणीपातळी एक ते सव्वा इंचाने कमी होत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा तलावात एक फूट पाणीसाठा कमी आहे. हा पाणीसाठा पावसाळ्यापर्यंत टिकून राहावा यासाठी पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे. एकूण तीन व्हॉल्व्हद्वारे पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या कास तलावातील एक व्हॉल्व्ह पूर्णपणे उघडा पडला असून सध्याचा शिल्लक पाणीसाठा पाहता एप्रिल महिन्यापर्यंत दुसरा व्हॉल्व्ह उघडा पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

कोट

सध्या कास तलावात पंधरा फूट पाणीसाठा शिल्लक असून, गतवर्षीच्या तुलनेत एक ते सव्वा फुटाने पाणीसाठा कमी असल्याने नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर केल्यास जूनपर्यंत पाणी पुरू शकेल.

जयराम किर्दत

पाटकरी -कास तलाव

Web Title: Dramatic drop in water level of Kas Lake!