साताऱ्यात छऱ्याच्या बंदुकीतून श्वानावर झाडली गोळी, अज्ञातावर गुन्हा; पोलिसांकडून तपास सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 16:06 IST2025-12-10T16:04:54+5:302025-12-10T16:06:25+5:30
पायात गोळी लागल्याने श्वान जखमी झाले

संग्रहित छाया
सातारा : घरासमोर असलेल्या पाळीव श्वानावर छऱ्याच्या बंदुकीतून गोळी झाडल्याने अज्ञातावर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (दि. ७) गोडोली येथे घडली.
सुनील वामनराव जाधव (५९, रा. सिद्धिविनायकनगर, गोडोली, सातारा) यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जाधव हे सेवानिवृत्त शिक्षक असून, त्यांचे पाळीव श्वान दुपारच्या सुमारास त्यांच्या घरासमोर होते. त्यावेळी छऱ्याच्या बंदुकीतून अज्ञाताने श्वानाच्या डाव्या पायात गोळी मारून त्याला जखमी केले.
हा प्रकार समोर आल्यानंतर जाधव यांनी अज्ञाताविरोधात सातारा शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. हवालदार जाधव हे अधिक तपास करीत आहेत.