साताऱ्यात डॉक्टरकडून ओपीडीमध्येच अल्पवयीन मुलीशी अश्लील कृत्य, इंजेक्शन देऊन ठार मारण्याची दिली धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 15:18 IST2025-07-14T15:18:22+5:302025-07-14T15:18:44+5:30
पीडित तरुणीच्या शरीराच्या विविध भागांचे फोटो त्याच्या मोबाइलमध्ये काढले

साताऱ्यात डॉक्टरकडून ओपीडीमध्येच अल्पवयीन मुलीशी अश्लील कृत्य, इंजेक्शन देऊन ठार मारण्याची दिली धमकी
सातारा : फिजिओथेरपीसाठी गेलेल्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीशी एका डाॅक्टरने ओपीडीमध्येच अश्लील कृत्य केले. हा प्रकार कोणाला सांगितलास, तर तुला इंजेक्शन देऊन मारून टाकीन, अशी धमकीही दिल्याचे समोर आले. हा धक्कादायक प्रकार ३ जुलै रोजी दुपारी ०३:३० वाजेच्या सुमारास साताऱ्यात घडला.
याप्रकरणी संबंधित डाॅक्टरवर सातारा शहर पोलिस ठाण्यात विनयभंगासह पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डाॅ. आदिश रमेश पाटील, असे गुन्हा दाखल झालेल्या डाॅक्टरचे नाव आहे.
पीडित मुलगी संशयित डाॅक्टर आदिश पाटील याच्या ओपीडीमध्ये फिजिओथेरपीसाठी जात होती. त्यावेळी डाॅक्टरने पीडित तरुणीच्या शरीराच्या विविध भागांचे फोटो त्याच्या मोबाइलमध्ये काढले. हे फोटो दाखवून ही गोष्ट कोणाला सांगितलीस, तर तुला इंजेक्शन देऊन मारून टाकीन, अशी त्याने धमकी दिली, तसेच मुलीच्या अंगावरील कपडे काढून तिच्याशी अश्लील कृत्य केले. या प्रकारानंतर पीडित मुलीने दि.१२ रोजी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.