शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
6
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
7
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
8
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
9
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
10
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
11
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
12
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
13
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
14
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
15
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
16
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
17
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
18
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
19
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
20
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
Daily Top 2Weekly Top 5

कांद्यामुळेही धुमधडाक्यात दिवाळी

By admin | Updated: November 9, 2015 23:29 IST

ज्या कोणी केली त्यांना मात्र वधारलेल्या दरामुळे लॉटरीच लागली. आतापर्यंतचा सर्वात उच्चांकी दर चालूवषी कांद्याने गाठला

चालूवर्षी कांदा उत्पादक शेतकरी वर्गाची दिवाळी होणार गोड. शेतकऱ्याच्या मालाला बाजारात मिळणाऱ्या बाजार भावामुळे आतापर्यंत आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत असतानाच सध्या जीवनावश्यक असणाऱ्या कांद्याने मात्र उच्चांकी दर गाठल्यामुळे आडसाल कांदा उत्पादक शेतकरी वर्गाची दिवाळी गोड झाली आहे. निसर्गाच्या मनात कधी काय येईल, हे कोणालच न उलगडणारं सत्य आहे. आणि या निसर्गाच्या बदलामुळे म्हणा किंवा कांद्याच्या उत्पादनात आलेल्या घटीमुळे बाजारामध्ये एकदम कांद्याचे दर वधारले आणि गृहिणींच्या डोळ्यात कांद्यामुळे नव्हे तर कांद्याच्या दरामुळे पाणी येऊ लागले. आडसाल विकला जाणारा कांद्याचे दर एकदम तेजीत आले. तर खटाव-माण सारख्या दुष्काळी पट्ट्यात आजही कांदा साठवणुकीसाठी कांदा चाळ (ऐरण)चा वापर सर्रास शेतकरी वर्ग करताना दिसून येतो का, काढणीनंतर जर कांद्याला योग्य भाव मिळत नसेल तर निघालेल्या कांद्याची योग्यरित्या या चाळीत साठवणूक करून हा कांदा सुरक्षित ठेवला जातो. आणि योग्य दर आल्यानंतर या ऐरणी फोडून बाजारामध्ये विक्रीसाठी पाठवतात. दरवर्षी कांदा उत्पादन करणाऱ्या शेतकरी वर्गाला मिळणाऱ्या उत्पादनातून पिकासाठी केलेल्या खर्चाइतपतही पैसे मिळत नसल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी कांद्याची लागण केली नाही. तर ज्या कोणी केली त्यांना मात्र वधारलेल्या दरामुळे लॉटरीच लागली. आतापर्यंतचा सर्वात उच्चांकी दर चालूवषी कांद्याने गाठला. आणि २५ ते ७० रु पयांपर्यंत दर लागत गेला. त्यामुळे शेतकरीऱ्याला ज्या कांद्याच्या उत्पादनातून उलटी पट्टी येत होती तेथे कांद्याच्या पिकाने विक्रमच केला. आणि कांदा उत्पादक शेतकरी मालामाल झाला. शेतातच कांद्याचा सौदा व्यापारी लोक करू लागल्यामुळे मार्केटमध्येही शेतकऱ्याला जाण्याची गरज पडली नाही. प्रत्येकवर्षी दुष्काळी परिस्थिीती निर्माण होतेच . खटाव-माण तालुक्यांत या दुष्काळी परिस्थितीला येथील शेतकऱ्याला सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत बऱ्याच शेतकऱ्याला या पिकाने तारले असल्याचे दिसून येत आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना कांद्याच्या उत्पादनातून फायदा झाला आहे. त्यामुळे चालूवर्षी निदान दिवाळी सण तरी उत्साहाने व आनंदाने साजरा करता येईल, याची आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येत आहे. कांद्यामुळे मात्र चालूवर्षी शेतकऱ्यांची दिवळी गोड होणार आहे. --नम्रता भोसले