शेतातून ट्रॅक्टर नेण्यावरून वाद, उसासकट पेटवून देण्याची तरुणाला धमकी; एकावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2022 18:06 IST2022-04-28T17:48:32+5:302022-04-28T18:06:10+5:30

सातारा : शेतातून ट्रॅक्टर का नेलास, असे विचारत एका तरुणाला तुझ्या उसासकट तुला पेटवून देईन, अशी धमकी देऊन मारहाण ...

Dispute over taking a tractor from the Farm, threatening to set fire to the youth in satara | शेतातून ट्रॅक्टर नेण्यावरून वाद, उसासकट पेटवून देण्याची तरुणाला धमकी; एकावर गुन्हा दाखल

शेतातून ट्रॅक्टर नेण्यावरून वाद, उसासकट पेटवून देण्याची तरुणाला धमकी; एकावर गुन्हा दाखल

सातारा : शेतातून ट्रॅक्टर का नेलास, असे विचारत एका तरुणाला तुझ्या उसासकट तुला पेटवून देईन, अशी धमकी देऊन मारहाण करण्यात आली. ही घटना मंगळवार (दि. २६) रोजी ललगुण, ता.खटाव येथे घडली. याप्रकरणी पुसेगाव पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल झाला आहे. प्रताप अनिल घाडगे उर्फ छकुल्या (रा. ललगुण. ता. खटाव, जि. सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अभिषेक अंकुश जाधव (वय २०, रा. ललगुण, ता. खटाव, मूळ रा. जांब खुर्द, ता. कोरेगाव) याने मामाचा उसाचा ट्रॅक्टर प्रताप घाडगे याच्या चुलत चुलत्याच्या शेतातून नेला. या कारणावरून घाडगे याने अभिषेकला उसासकट पेटवून देण्याची धमकी दिली. तसेच उसाच्या दांडक्याने मारहाण केली. यामध्ये अभिषेकच्या अंगावर सर्वत्र वळ उटले आहेत. या प्रकारानंतर अभिषेक जाधवने पुसेगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. याप्रकरणी हवालदार बर्गे हे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Dispute over taking a tractor from the Farm, threatening to set fire to the youth in satara