शहरं
Join us  
Trending Stories
1
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
2
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
3
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
4
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
5
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
6
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
7
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
8
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
9
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
10
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
11
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
12
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
13
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
14
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
15
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
16
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
17
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
18
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
19
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
20
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी

साताऱ्यातील धरणांतून सिंचनासाठी विसर्ग सुरू, शेतकऱ्यांची चिंता दूर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 15:57 IST

सांगली जिल्ह्याची पाणी मागणी पुढील काळात आणखी वाढणार

सातारा : जिल्ह्यातील प्रमुख सहा पाणी प्रकल्प अजूनही काठापर्यंत भरले असून, १४१ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे; पण सध्या रब्बी हंगामासाठी पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे. त्यामुळे पुढील काळात विसर्गही वाढणार असल्याने धरणांतील साठाही कमी होणार आहे. तसेच आठवड्यापासून कोयना धरणातून सांगली जिल्ह्यातील सिंचनासाठी पाणी सोडले जात आहे.सातारा जिल्ह्यात कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी आणि उरमोडी ही मोठी धरणे आहेत. जिल्ह्याच्या पश्चिम भागात असलेल्या या धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता सुमारे १४८ टीएमसी आहे. या धरणांतील पाण्यावर सातारा तसेच सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांतील पाणी योजना अवलंबून आहेत. त्यामुळे पावसाळ्यात धरणे भरली की पुढील नऊ महिने चिंता करण्याचे कारण नसते. त्यातच यावर्षी जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या १२० टक्क्यांहून अधिक पर्जन्यमान झाले. या पावसामुळे प्रमुख धरणांबरोबरच छोटे प्रकल्प भरले आहेत. त्यामुळे उन्हाळ्यापर्यंत चिंतेचे कारण राहिलेले नाही.

जिल्ह्यात यावर्षी रब्बी हंगामातील पिके चांगली आलेली आहेत. त्यामुळे सध्या पिकांना पाणी देण्याची गरज आहे. यासाठी धरणांतून सिंचनासाठी पाणी सोडण्याची मागणी होत आहे. जिल्ह्यातील सध्या धोम, कण्हेर, कोयना आणि उरमोडी या धरणांतून पाणी सोडले जात आहे. तर सध्या कोयना धरणात अजूनही १०० टीएमसीवर पाणीसाठा शिल्लक आहे. तर धोममध्ये १२.५९ टीएमसी, कण्हेरमध्ये ९ टीएमसी पाणी शिल्लक आहे.गेल्यावर्षी कमी पर्जन्यमानामुळे उरमोडी धरणात जेमतेम सहा टीएमसीच पाणीसाठा झाला होता; पण यंदा धरण भरून वाहिले. त्यातच अजूनही धरण काठोकाठ आहे. या धरणावरच दुष्काळी माण आणि खटाव तालुक्यांतील सिंचन योजना अवलंबून आहेत. यंदा कोयना धरणही भरल्याने शेतकऱ्यांची चिंता दूर झालेली आहे.सांगलीसाठी १०५० क्युसेक विसर्गजिल्ह्यातील धोम धरणातून सध्या ७०५, कण्हेर धरणाच्या डावा आणि उजवा कालव्याद्वारे ४७५ क्युसेक पाणी विसर्ग सिंचनासाठी सुरू आहे. तर उरमोडी धरणातून १५० क्युसेक पाणी विसर्ग नदीद्वारे सोडण्यात आलेला आहे. हे पाणीही सिंचनासाठी जात आहे. तर कोयना धरणाच्या पायथा वीजगृहाचे एक युनिट सुरू करून १ हजार ५० क्युसेक विसर्ग सुरू आहे. हे पाणी सांगली जिल्ह्यातील सिंचन तसेच इतर कारणांसाठी सोडण्यात आलेले आहे. सांगली जिल्ह्याची पाणी मागणी पुढील काळात आणखी वाढणार आहे.

जिल्ह्यातील पाणी प्रकल्प स्थिती..

धरण - सध्याचा साठा - टक्केवारी - एकूण क्षमता (टीएमसीमध्ये)

  • धोम - १२.५९ - ९३.२४ - १३.५०
  • कण्हेर - ९.२४ - ९१.४४ - १०.१०
  • कोयना - १००.२८ - ९५.२८ - १०५.२५
  • बलकवडी - ४.०४ - ९९.०४ - ४.०८
  • तारळी - ५.३४ - ९१.३३ - ५.८५
  • उरमोडी - ९.७९ - ९८.२७ - ९.९६
टॅग्स :Satara areaसातारा परिसरDamधरणWaterपाणीFarmerशेतकरी