पोकलेनमधील डिझेल चोरी करणाऱ्या तिघांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2022 18:11 IST2022-03-24T18:03:08+5:302022-03-24T18:11:02+5:30
सातारा : सातारा शहराजवळील कृष्णानगरमध्ये पोकलेनमधील डिझेलची चोरी करणाऱ्या तिघांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ...

पोकलेनमधील डिझेल चोरी करणाऱ्या तिघांवर गुन्हा
सातारा : सातारा शहराजवळील कृष्णानगरमध्ये पोकलेनमधील डिझेलचीचोरी करणाऱ्या तिघांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी हवालदार हर्षा गायकवाड यांनी तक्रार दिली आहे. त्यानंतर महेश श्रीरंग फडतरे, रणजित दिलीप अवघडे (दोघेही रा. गोंदवले बुद्रुक, ता. माण) आणि अन्य एकाच्या विरोधात चोरीचा गुन्हा नोंद केला आहे.
काल, बुधवारी (दि. २३) सायंकाळी सवापाचच्या सुमारास कृष्णानगर येथील महावितरण कार्यालयासमोर हा प्रकार घडला. पोकलेनमधील डिझेल काढताना एक संशयित पळून गेला, तर या घटनेत ३ हजार १५० रुपयांचे ३५ लिटर डिझेल चोरी करताना संशयित आढळले होते. सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला असून हवालदार मोहिते हे तपास करीत आहेत.