सोनके विकास सेवा सोसायटी चेअरमनपदी धुमाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:52 IST2021-02-27T04:52:43+5:302021-02-27T04:52:43+5:30

पिंपोडे बुद्रुक : सोनके (ता. कोरेगाव) येथील विकास सेवा सोसायटी चेअरमनपदी नितीन धुमाळ तर व्हा. चेअरमनपदी राजेंद्र धुमाळ यांची ...

Dhumal as Sonke Vikas Seva Society Chairman | सोनके विकास सेवा सोसायटी चेअरमनपदी धुमाळ

सोनके विकास सेवा सोसायटी चेअरमनपदी धुमाळ

पिंपोडे बुद्रुक : सोनके (ता. कोरेगाव) येथील विकास सेवा सोसायटी चेअरमनपदी नितीन धुमाळ तर व्हा. चेअरमनपदी राजेंद्र धुमाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ठरल्याप्रमाणे मुदतीनंतर चेअरमन कुंडलिक यादव व व्हा. चेअरमन कस्तुरा धुमाळ यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागांवर निवडीसाठी आयोजित निवडणूक कार्यक्रमात नितीन धुमाळ यांची चेअरमन तर व्हा. चेअरमनपदी राजेंद्र धुमाळ यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. सचिव मानसिंग निकम यांनी निवडणूक सहायक म्हणून काम पाहिले. यावेळी संचालक, सभासद आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निवडीनंतर माजी जिल्हा परिषद सदस्य सतीश अण्णा धुमाळ, सरपंच संभाजी धुमाळ, आदर्श वेलफेअर ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप धुमाळ, प्रगतशील शेतकरी सुरेश धुमाळ यांनी उभयतांचे कौतुक केले. दरम्यान, सभासदाच्या व सोसायटीच्या विकासासाठी प्राधान्याने पाठपुरावा करणार असल्याचे चेअरमन नितीन धुमाळ यांनी सांगितले.

Web Title: Dhumal as Sonke Vikas Seva Society Chairman