शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळीमुळे बळिराजात धाकधुक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यात तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण कायम असून काही वेळा अवकाळी पावसाचाही शिडकावा होत आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जिल्ह्यात तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण कायम असून काही वेळा अवकाळी पावसाचाही शिडकावा होत आहे. यामुळे बळिराजा धास्तावला असून पिके आणि फळबागा वाचविण्यासाठी महागड्या औषधांची फवारणी करीत आहे. तरीही हातात काही पडेल का, याची शाश्वती नाही.

जिल्ह्यातील बळिराजा मागील दोन वर्षांपासून सतत निसर्गाशी सामना करीत आला आहे. २०२० मधील अतिवृष्टीत तर २५ हजार हेक्टरांवरील पिकांचे नुकसान झाले; तर ८० हजार शेतकऱ्यांना फटका बसला. त्यातून शेतकरी कसाबसा सावरत असतानाच आता अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे काळजीचे ढग दाटून आले आहेत. त्यामुळे पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची केविलवाणी धडपड सुरू आहे.

मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी पावसाचा शिडकावाही झाला. त्यामुळे गहू, बटाटा, घेवडा पिकांवर करपा रोग पडण्याची भीती निर्माण झाली आहे. ज्वारीची पिके पोटऱ्या धरू लागली आहेत. त्यामध्ये पावसाचे पाणी जाऊन कणसे खराब होऊ शकतात. तसेच हरभऱ्यावरही रोग पडण्याची भीती आहे. द्राक्षबागधारकांत ढगाळ वातावरण आणि पावसामुळे भीतीचा गोळा आला आहे. त्यामुळे शेतकरी पिके आणि फळबागा वाचविण्यासाठी औषध फवारणी करू लागले आहेत. पदरी काहीतरी पडावे, एवढीच आशा आता शेतकऱ्यांना लागून राहिली आहे.

दरम्यान, ढगाळ वातावरणामुळे कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील शेतकऱ्यांनी कांदा, गहू पिकांवर कीटकनाशकांची फवारणी सुरू केली आहे. अजून काही दिवस ढगाळ वातावरण राहिल्यास शेतकऱ्यांचा रब्बी हंगामही वाया जाऊ शकतो. तसेच फळबागांकडूनही त्यांना फारशी आशा करता येणार नाही, अशी स्थिती आहे.

कोट :

तीन महिन्यांपूर्वी अतिवृष्टीत पिकांचे नुकसान झाले. त्यावेळी अगदी कमी लोकांना मदत मिळाली. आता तर ढगाळ हवामान आणि अवकाळी पावसामुळे पिकांचे आणि फळबागांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यातूनही पिके वाचविण्यासाठी औषधांची फवारणी सुरू आहे. त्यामुळे खर्च वाढला आहे. शेतकऱ्यांना सतत निसर्गाशी सामना करावा लागत आहे.

- गुलाब जगताप, माजी उपसभापती, कोरेगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती

फोटो दि.०५सातारा अ‍ॅग्रो फोटो...

फोटो ओळ : ढगाळ वातावरण तयार होत असल्याने कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागात कांदा पिकावर शेतकरी कीटकनाशकांची फवारणी करू लागले आहेत.

...................................................