शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

वाईतील मुद्रांक विक्रेत्यांची बैठकीसाठी जागा देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:26 IST

वाई : वाईमधील परवानाधारक मुद्रांक विक्रेते आणि दस्त लेखनिक ४० वर्षांपासून वाई तहसील कार्यालयाने ठरवून दिलेल्या जागेत बसत ...

वाई : वाईमधील परवानाधारक मुद्रांक विक्रेते आणि दस्त लेखनिक ४० वर्षांपासून वाई तहसील कार्यालयाने ठरवून दिलेल्या जागेत बसत होते. सध्या तेथील इमारत पाडल्याने मोठी गैरसोय निर्माण झाल्याने नवीन इमारतीत बैठक व्यवस्थेसाठी जागा उपलब्ध करुन देण्याची मागणी त्यांनी निवेदनाद्वारे प्रांताधिकारी संगीता चौगुले-राजापूरकर यांच्याकडे केली आहे.

गेल्या ४० ते ५० वर्षांपासून परवानाधारक असलेले मंगेश बाचल, रघुनाथ मालुसरे, जगन्नाथ जगताप, विद्याधर जगताप, विनोद सकुंडे, संदीप माने, संतोष शिंदे, प्रकाश बाबर, विलास जोशी, शिवाजी वाडकर असे १० जण वाई शहरातील तहसील कार्यालय आवारातील जागेत वाई, खंडाळा, महाबळेश्वर आणि राज्यातील खरेदी-विक्रीच्या व्यवहारासाठी वाई येथे येणाऱ्या सर्व नागरिकांना स्टॅम्प पेपर देत होते. सर्व व्यवहार सुरळीतपणे पार पाडून शासनाच्या महसुलात भर टाकण्याचे काम विनातक्रार करत असत. पण, काही महिन्यांपूर्वी वाई महसूल कार्यालयाने प्रशस्त अशी इमारत नव्याने बांधल्याने त्या इमारतीच्या चौफेर कंपाऊंडचे बांधकाम करण्यासाठी सुरुवात करण्यात आली. त्यामुळे मुद्रांक विक्रेते आणि खरेदी विक्रीच्या दस्तांचे लिखाण करणाऱ्यांसाठी असणारी बैठक व्यवस्थेची इमारत पाडल्यामुळे त्यांची मोठी गैरसोय निर्माण झाली आहे. मुद्रांक विक्रेते आणि दस्त लेखनिक यांना बैठक व्यवस्थाच नसल्याने ते अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे खरेदी-विक्रीचे व्यवहार करणारे शेतकरी व इतर नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. ही होणारी गैरसोय टाळण्यासाठी येथील स्टॅम्प विक्रेते आणी दस्त लेखनिक यांनी एकत्रित येऊन तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीमध्ये बसण्यासाठी जागा उपलब्ध करुन देण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.