शहरं
Join us  
Trending Stories
1
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
2
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
3
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
4
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
5
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
6
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
7
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
8
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
9
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
10
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
11
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
12
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
13
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
14
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
15
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
16
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
17
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
18
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
19
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
20
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती

Satara: महाबळेश्वरच्या सीमेवरील जंगलात हरणाची शिकार, चौघांच्या टोळीला अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2024 12:45 PM

गावठी बंदूक, काडतुसे, कोयता जप्त

महाबळेश्वर (जि. सातारा) : मेढा व महाबळेश्वर तालुक्याच्या सीमेवरील घनदाट जंगलात पिसोरी हरणाची शिकार करणाऱ्या चार जणांच्या टोळीला वन विभागाने अटक केली. शिवाजी चंद्रकांत शिंदे, दीपक शंकर शिंदे, आदित्य दीपक शिंदे (तिघे रा. कुरोशी, ता. महाबळेश्वर) व गणेश कोंडिबा कदम (रा. गोगवे, ता. महाबळेश्वर) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.या टोळीकडून शिकारीसाठी वापरण्यात येणारी गावठी बंदूक, काडतुसे, वाघर, कोयता व शिकार केलेली पिसोरी हरिणाचा मृतदेह जप्त केला आहे. महाबळेश्वर व मेढा वन विभागच्या संयुक्त पथकानेही कारवाई केली आहे.रविवारी पहाटे महाबळेश्वर व मेढा येथील वन विभागाचे कर्मचारी गस्त घालत असताना राजमार्गावरील मोळेश्वर फाटा ते सह्याद्रीनगर रस्त्यावर राखीव वनात दोन व्यक्ती संशयीतरीत्या आढळून आले. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना दोघांचा संशय आल्याने त्यांनी त्या दोघांची चौकशी सुरू केली.वन कर्मचाऱ्यांनी दोघांजवळील साहित्यांची तपासणी केली असता शिकारी टोळीचे बिंग फुटले. त्या दोघांजवळ पिशवीत वाघर, काडतुसे व कोयता आढळून आला. पकडलेल्या दोघांकडून गावठी बंदूक व बंदुकीच्या मदतीने शिकार केलेली पिसोरी हरिण व इतर साहित्य जप्त केले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थानCrime Newsगुन्हेगारी