शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

कांदा लागवडीत घट...

By admin | Updated: November 9, 2014 23:35 IST

विजेचे भारनियमन, पाण्याची उपलब्धता, खते, किटकनाशके व मजुरीच्या वाढलेल्या दरामुळे गतवर्षीच्या तुलनेत

सातारा : माण-खटाव तालुक्याचे प्रमुख नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कांदा पिकांची लागवड करण्यात बुध, ललगुण व डिस्कळ परिसरातील शेतकरी वर्ग गुंतला आहे. कांदा लागण आता अंतिम टप्प्यात आली असून विजेचे भारनियमन, पाण्याची उपलब्धता, खते, किटकनाशके व मजुरीच्या वाढलेल्या दरामुळे गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी कांदा लागवडीत निम्म्यापेक्षा जास्त घट झाल्याचे दिसून येत आहे.सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सुरू झालेली कांदा लागण रब्बी पिकांच्या पेरणी दरम्यान काही काळ मंदावली होती. मात्र पेरणीची कामे उरकताच पुन्हा कांदा लागणीस वेग आला आहे. कांदा लागणीबरोबर सध्या परिसरात गहू व ज्वारी पिकांच्या आंतरमशागतीची कामे सुरू असल्याने कांदा लागणीसाठी महिला मजुरांची मोठी चणचण भासत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी भारनियमनाच्यावेळा सांभाळत कांदा लागण करत आहेत. मोठे शेतकरी महिला मजुरांच्या गटांमार्फत कांदा लागण करताना दिसत आहेत. वाफ्यामध्ये पाण्यात लागण करण्यास एकरी सहा हजार रुपये व गादी वाफ्यावर लागवड करण्यास सात हजार रुपये मजुरी घेण्यात येत आहे. कमी कालावधीमध्ये हमखास पैसे मिळवून देणारे नगदी पीक म्हणून या पिकाकडे पाहिले जाते. उत्तर खटाव परिसरात डिस्कळ, गारवडी, शिंदेवाडी, ललगुण, नागनाथवाडी, फडतरवाडी, बुध, काटेवाडी, वेटणे, राजापूर, पांगरखेल आदी गावातील शेतकरी दरवर्षी रब्बी हंगामात सुमारे दीडशे ते दोनशे एकर क्षेत्रावर कांद्याची लागवड करतात. यावर्षी कांदा लागण घटल्याचे दिसून येत आहे. बियाण्याचे वाढलेले दर, खतांच्या वाढलेल्या किमती, किटकनाशके व मजुरीच्या दरात झालेली वाढ, प्रतिकूल हवामान, दर घसरणीचा परिणाम कांदा लागणीवर झाल्याचे दिसत आहे. (प्रतिनिधी)इतर पिकांवर भर...कांदा या पिकात हमखास पैसे मिळण्याऐवजी शेतकऱ्यांना नुकसानच सोसावे लागत आहे. त्यामुळे यावर्षी बहुतांश शेतकऱ्यांनी कांदा लागवडीकडे पाठ फिरवली असल्याचे दिसून येत आहे. यंदा अनेक शेतकऱ्यांचा बटाटा, आले, ऊस व अन्य पिकांवर भर दिल्याचे दिसून येत आहे.