शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
5
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
6
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
7
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
8
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
9
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
10
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
11
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
12
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
13
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
14
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
15
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
16
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
17
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
18
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
19
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
20
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
Daily Top 2Weekly Top 5

कोरेगाव बाजार समितीचा आज फैसला

By admin | Updated: August 18, 2015 22:34 IST

निवडणूक : विक्रमी ९६ टक्के मतदान

कोरेगाव : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोरेगाव शेती उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी मंगळवारी शांततेत ९५.९८ टक्के मतदान झाले. एकूण १४ मतदान केंद्रे उभारण्यात आली होती. दरम्यान, बुधवार दि. १९ रोजी सकाळी नऊ वाजता मतमोजणी होणार आहे.पणन मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे तानाजीराव शिंदे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली होती. त्यामुळे उर्वरित १८ जागांसाठी तब्बल १५३ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. छाननीमध्ये ४४ अर्ज अवैध ठरविल्याने १०९ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले होते. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी नाट्यपूर्ण घडामोडी घडत गेल्या आणि तब्बल ६५ जणांनी माघार घेतल्याने निवडणूक रिंगणात केवळ ४४ जण राहिले होते.कोरेगाव, रहिमतपूर, कुमठे, किन्हई, देऊर व पिंपोडे बुद्रुक येथे मतदान केंद्रे उभारण्यात आली होती. मंगळवारी सकाळी ८ वाजता कडेकोट पोलीस बंदोबस्तात मतदानास सुरुवात झाली. सकाळी मतदानाला वेग होता, दुपारी मात्र तो मंदावला. शेवटच्या दोन तासात पुन्हा मतदानाने वेग घेतला. राष्ट्रवादीसह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मतदारांशी संपर्क साधून मतदान करण्याबाबत विचारणा करत होते, त्यामुळे मतदानाची टक्केवारी चांगलीच वाढली. मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक प्रीती काळे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संजय काकडे, बाजार समितीचे सचिव संताजी यादव, पोलीस निरीक्षक प्रकाश धस, सहाय्यक पोलीस निरीक्षक शहाजी निकम व यशवंत ढगे यांनी प्रयत्न केले. (प्रतिनिधी)..२,६५३ मतदारांनी बजावला हक्कविकास सोसायटी मतदारसंघात १११५ पैकी १०९४, ग्रामपंचायत मतदारसंघात १०६९ पैकी १००७, व्यापारी-आडते मतदारसंघात ५०६ पैकी ४७८, हमाल-तोलारी मतदारसंघात ७५ पैकी ७४ मतदान झाले. एकूण २७६५ पैकी २६५३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.