मारहाणीत जखमी झालेल्या वृद्धेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:39 IST2021-05-23T04:39:16+5:302021-05-23T04:39:16+5:30

सातारा : लोणंद (ता. खंडाळा) येथील वृद्धेला मारहाण झाल्याची घटना दोन दिवसापूर्वी घडली होती. त्या महिलेचा उपचारादरम्यान शनिवारी ...

Death of an old man injured in a beating | मारहाणीत जखमी झालेल्या वृद्धेचा मृत्यू

मारहाणीत जखमी झालेल्या वृद्धेचा मृत्यू

सातारा : लोणंद (ता. खंडाळा) येथील वृद्धेला मारहाण झाल्याची घटना दोन दिवसापूर्वी घडली होती. त्या महिलेचा उपचारादरम्यान शनिवारी सकाळी जिल्हा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. कुसुम आबाजी गायकवाड (वय ७५) असे मृत झालेल्या वृद्धेचे नाव आहे.

जिल्हा शासकीय रुग्णालयातील पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बुधवार दि. १९ रोजी कुसुम गायकवाड यांच्या घराशेजारी असणाऱ्या भाचा अविनाश शशिकांत गायकवाड, अतुल शशिकांत गायकवाड यांनी व इतर दोघांनी काठी व लाथाबुक्क्यांनी त्यांना मारहाण केली होती. यात त्या जखमी झाल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. शनिवारी सकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

जिल्हा रुग्णालयातील पोलिसांनी घेतलेला जबाब लोणंद पोलीस ठाण्यात पाठविल्यानंतर संबंधित संशयितावर आता खुनाचा गुन्हा दाखल होणार असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

Web Title: Death of an old man injured in a beating