शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

फाटलेली भित्तिपत्रके भिंतीवरून गायब !

By admin | Updated: November 8, 2015 23:41 IST

कऱ्हाड पंचायत समिती : शासकीय योजनांची माहिती नव्या पत्रकांवर; सूचना फलकावरील प्रसिद्धीपत्रके मात्र ‘जैसे थे’--लोकमतचा दणका

कऱ्हाड : शासकीय योजनांची माहिती देणाऱ्या भित्तिपत्रकांच्या प्रसिद्धीसाठी कऱ्हाड पंचायत समितीमध्ये अधिकाऱ्यांकडून अनास्था दाखविली जात होती. याबाबत काही दिवसांपूर्वीच ‘लोकमत’ने अधिकाऱ्यांच्या अनास्थेबाबत व फाटलेल्या अवस्थेत असलेल्या भित्तिपत्रकांबाबत वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर या प्रकाराकडे अधिकाऱ्यांनी लक्ष दिले व फाटलेल्या स्थितीत असलेली भित्तिपत्रके काढून टाकली आहेत. तर काही ठिकाणी नवीन भित्तिपत्रकेही बसवली. शुक्रवारी पंचायत समितीची मासिक सभा झाली. या सभेत वीजवितरण कंपनीतील अधिकाऱ्यांवर सदस्यांनी चांगलेच ताशेरे ओढले. त्यांच्याप्रमाणे आपलेही भर सभेमध्ये ताशेरे ओढू नये म्हणून नव्या योजनांची फाटलेली भित्तिपत्रके काढून टाकण्यात पंचायत समितीमधील एका विभागातील अधिकाऱ्यांनी धन्यता मानली आहे. मात्र, नव्या योजनांबाबत माहिती देण्याचे औदार्य अजूनही अधिकाऱ्यांकडून दाखविले जात नाही. कऱ्हाड पंचायत समितीमध्ये दोन दिवसांपूर्वी लावण्यात आलेल्या ‘स्वच्छ भारत’ मिशनच्या जिल्हा ‘पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमाची माहिती देणाऱ्या भित्तिपत्रकांची दुरवस्था झाली होती. याचप्रमाणे इतरही ठिकाणी लावण्यात आलेल्या भित्तिपत्रकांची अवस्था वाचता येईना, अशी झाली होती. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करताच दुसऱ्या दिवशी दुरवस्थेत असलेल्या भित्तिपत्रके अधिकाऱ्यांनी काढून टाकले. तर काही ठिकाणी नव्याने भित्तिपत्रके बसवली. या योजनांची माहिती जास्तीत जास्त ग्रामीण भागातील लोकांपर्यंत पोहचावी, या उद्देशाने वाटण्यात आलेल्या भित्तिपत्रकांना काही आरोग्य रुग्णालये, शासकीय कार्यालय तसेच ग्रामपंचायती अशा ठिकाणी लावण्यात आले आहे.कऱ्हाड पंचायत समितीमधील अधिकाऱ्यांकडून शासकीय योजनांची माहिती दिली जात नसल्याचे सांगत प्रत्येक मासिक सभेमध्ये सदस्यांकडून तक्रारी केल्या जातात. आम्ही काळजी घेतो, लवकरच काम पूर्ण होईल, आजच बैठका घेतो. अशी मासिक सभेदरम्यान शासकीय अधिकाऱ्यांकडून बतावणी केली जाते. त्यामुळे प्रत्येक सभेवेळी अधिकारी व सदस्य यांच्यात खडाजंगी पाहावयास मिळते. शासकीय योजनांची माहिती काही जवळच्याच लोकांना दिली जात असून, सामान्य शेतकऱ्याला मात्र, ती दिली जात नसल्याचे सदस्यांकडून मासिक सभेदरम्यान अधिकाऱ्यांवर आरोप केले जातात. या अधिकाऱ्यांवर गटविकास अधिकारी यांचा वचक नसल्यानेच असे प्रकार घडत आहेत. त्यामुळे अशा प्रकाराबाबत सदस्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. (प्रतिनिधी)कोपऱ्यातील गठ्ठ्यांबाबत चर्चा !पंचायत समितीमधील शिक्षण विभागाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या आडोशाच्या खोलीसमोर गेल्या दोन महिन्यांपासून पडून शासकीय योजनांच्या फायलींचे गठ्ठे पडून आहेत. या गठ्ठ्यांना गोदाममध्ये हलविण्यात आले तरी चालेल; मात्र याबाबत गटविकास अधिकारी अविनाश फडतरे निर्णय घेत नसल्याने गठ्ठे तसेच पडून आहेत. अशी चर्चा दबक्या आवाजात शासकीय कर्मचाऱ्यांमधून केली जात आहे.इमारतीला मात्र रंगरंगोटीकऱ्हाड पंचायत समितीच्या नवीन इमारतीला नव्याने रंगरंगोटी करण्यात आली आहे. संपूर्ण दोन मजली इमारतीला रंग देण्यात आल्याने बाहेरून इमारत नवीन दिसत आहे. तर आतमध्ये मात्र, भिंतींवर जाळ्या पसरलेल्या आहेत. प्रवेश करताच दृष्टीस नवीन भित्तिपत्रकेशासकीय योजनांची माहिती जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचावी या हेतूने पंचायत समितीमध्ये भित्तिपत्रके लावण्यात आली आहेत. कऱ्हाड पंचायत समिती इमारतीत प्रवेश करताच नवीन शासकीय योजनांचे भित्तिपत्रके दृष्टीस पडतात.‘स्वच्छ भारत’ मिशनअंतर्गत जिल्हा परिषदेतर्फे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांच्या ठिकाणी पंचायत समिती तसेच ग्रामपंचायतीमध्ये जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष ‘हात धुण्याचे टप्पे’, ‘पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रम’ अशा प्रकारच्या योजनांची व कार्यक्रमांची माहिती देणाऱ्या भित्तिपत्रकांचे वाटप करण्यात आले आहे.