शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय मिरवणुकांमध्येही ढोलताशाचा गजर

By admin | Updated: November 4, 2015 00:08 IST

डॉल्बी हद्दपार : ग्रामीण भागातही पारंपरिक वाद्यांना पसंती; व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण

तारळे : मिरवणुकांमध्ये डॉल्बीच्या ठेक्यावर नाचण्यासाठी वरती होणारे हात आता ढोल, ताशा व झांज वाजविण्यात मग्न असल्याचे दिसते. गणपतीनंतर दुर्गादेवी व आता राजकीय मिरवणुकीसह इतर कार्यक्रमांतही हे चित्र आता दिसून येत आहे. गणेशोत्सव व दुर्गा उत्सवाच्या मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांन बगल देत डॉल्बीचा जणू पायंडा पाडला होता. डॉल्बीच्या दणदणाटामुळे तरूणाई वाममार्गाकडे वळण्याचे प्रकार घडत होते. डॉल्बीमुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडून अनेक समस्या उभ्या राहिल्या होत्या. भविष्यातील धोके ओळखून डॉल्बीच्याविरोधात आवाज उठला. ग्रामस्थांमधूनही याचे स्वागत झाले आणि याचाच परिपाक सध्याच्या मिरवणुकांमध्ये दिसून येत आहे. तारळेसारख्या ग्रामीण भागात हे चित्र अनेकांच्या भूवया उंचविणारे आहे. डॉल्बी बंदीमुळे अनेक पारंपरिक वाद्ये बाहेर आली. परिणामी यंदाचे दोन्ही उत्सव आदर्शवत झाले. उत्सवाला आलेले वेगळे स्वरूप दिसून आले. डॉल्बीमुळे उत्सवाला लागणारे गालबोट यंदा बहूतांशी मिरवणुकांत दिसून आले नाही. तसेच महिलांचा मिरवणुकीतील मोठ्या प्रमाणातील सहभाग बरेच काही सांगून गेला. मिरवणुकीतील बिभत्सपणा यंदाच्या मिरवणुकीत दिसला नाही.दुर्गा उत्सवानंतरही काही कारणास्तव मिरवणूका काढण्यात आल्या. मात्र, त्या मिरवणुकांमध्येही पारंपरिक वाद्यांवर भर देण्यात आला. काहींनी यंदा स्वत:ची ढोलपथके तयार केली आहेत. यामध्ये अनेक उच्चशिक्षित तरूणांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. (वार्ताहर) अनेकांनी थाटली ढोल पथकेडॉल्बी बंदीच्या मोहिमेला ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर यश मिळाले असल्याचे दिसते. डॉल्बीला बगल देत तरूणांनी हातात ढोल ताशा घेतला आहे. शहरी भागाच्या धर्तीवर ग्रामीण भागातही अनेक मंडळांकडून डॉल्बीऐवजी मिरवणुकीसाठी ढोल पथके स्थापन करण्यात येत आहेत. ढोल पथकांचा विशेष बाज बघून यापुढे अनेक मंडळांनी ढोल पथके स्थापन करण्याचा मानस व्यक्त केला आहे.