कार्यक्रमांना गर्दी; प्रत्येकी दहा हजारांचा दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:37 AM2021-03-08T04:37:08+5:302021-03-08T04:37:08+5:30

सातारा : कार्यक्रम व लग्नसोहळ्यातील नागरिकांच्या उपस्थितीवर निर्बंध असताना नागरिकांकडून सातत्याने या नियमांचे उल्लंघन केले जात आहे. रविवारी पालिका ...

Crowds to events; A fine of Rs 10,000 each was recovered | कार्यक्रमांना गर्दी; प्रत्येकी दहा हजारांचा दंड वसूल

कार्यक्रमांना गर्दी; प्रत्येकी दहा हजारांचा दंड वसूल

googlenewsNext

सातारा : कार्यक्रम व लग्नसोहळ्यातील नागरिकांच्या उपस्थितीवर निर्बंध असताना नागरिकांकडून सातत्याने या नियमांचे उल्लंघन केले जात आहे. रविवारी पालिका व पोलीस प्रशासाने संयुक्त मोहीम राबवून साताऱ्यातील एका सार्वजनिक कार्यक्रमासह लग्न सोहळ्यावर कारवाई केली. क्षमतेपेक्षा जास्त नागरिकांनी या कार्यक्रमांना हजेरी लावल्याने संबंधितांकडून प्रति दहा हजारांचा दंड वसूल करण्यात आला.

कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून ठोस पावले उचलण्यात आली आहेत. याचाच एक भाग म्हणून लग्न सोहळा व सार्वजनिक कार्यक्रमासाठी नागरिकांच्या उपस्थितीवर मर्यादा घालण्यात आली आहे. लग्न सोहळा व इतर कार्यक्रमासाठी केवळ पन्नास नागरिकांनाच जिल्हाधिकाऱ्यांकडून परवानगी देण्यात आली आहे. असे असताना रविवारी दुपारी शाहूनगर येथे पार पडलेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमासाठी पन्नासहून अधिक नागरिकांनी हजेरी लावली, तर सदर बझार येथे पार पडलेल्या घरगुती विवाह सोहळ्यासाठी क्षमतेपेक्षा अधिक नागरिक उपस्थित होते.

नियमांचे उल्लंघन केल्याने पालिका व पोलीस पथकाने संयुक्त मोहीम राबवून संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली. आयोजकांकडून प्रति दहा हजार असा एकूण वीस हजारांचा दंड वसूल करण्यात आला. पालिकेचे कोरोना विभाग प्रमुख प्रणव पवार यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.

Web Title: Crowds to events; A fine of Rs 10,000 each was recovered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.