गर्दी जमवून वाढदिवस साजरा करणे पडलं महागात, आठ जणांविरोधात गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2022 15:58 IST2022-03-25T15:57:13+5:302022-03-25T15:58:54+5:30
सातारा : सातारा शहरात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करुन गर्दी जमवून वाढदिवस साजरा करणे चांगलंच महागात पडले आहे. याप्रकरणी आठ ...

गर्दी जमवून वाढदिवस साजरा करणे पडलं महागात, आठ जणांविरोधात गुन्हा
सातारा : सातारा शहरात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करुन गर्दी जमवून वाढदिवस साजरा करणे चांगलंच महागात पडले आहे. याप्रकरणी आठ जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यातील हवालदार राहुल खाडे यांनी तक्रार दिली आहे. यानंतर साद युनुस शेख (वय १९, रा. गुरुवार पेठ, सातारा) आणि प्रथमेश किरण भागवत (३१, रा. विकासनगर खेड, सातारा) या दोघांसह अनोळखी ६ जणांवर गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बुधवारी (दि. २३) रात्री साडे आठच्या सुमारास कमानी हौद ते पोवई नाका जाणाऱ्या रस्त्यावर हा प्रकार घडला. वाढदिवस साजरा करण्यासाठी बेकायदशीररित्या जमाव जमविण्यात आला होता. तसेच तेथे विनामास्क गर्दी जमली होती.
याप्रकरणी कोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. सातारा शहर पोलीस ठाण्यातील हवालदार भिसे हे तपास करीत आहेत.