शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET UG 2026 re-exam Date: विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा; नीट परीक्षा जूनमध्ये, एनटीएकडून नवीन तारीख जाहीर
2
Monsoon Update : आनंदाची बातमी! बळीराजाची प्रतीक्षा संपली, मान्सून उद्या अंदमानात धडकणार; हवामान विभागाची मोठी अपडेट
3
Top Marathi News LIVE Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यूएईमध्ये; इंधनाचे दर, तुटवडा यावरील चर्चा महत्त्वाची
4
Petrol Diesel Price: देशभरात वाढले पेट्रोल-डिझेलचे दर, पण कुठे मिळतंय सर्वात स्वस्त आणि महाग; पाहा लिस्ट
5
"असं फक्त IPL मध्येच घडतं, PSL मध्ये नाही!" पडिक्कलचा प्रामाणिकपणा अन् शास्त्रींचा पाकिस्तानला टोला
6
Pm Modi Five Nation Tour : पीएम मोदींचा ५ देशांचा दौरा सुरू! 'UAE'मध्ये होणार भव्य स्वागत; कोणत्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाणार?
7
शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Sensex-Nifty मधील तेजीनं गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वाढल्या, 'या' क्षेत्रातील शेअर्स सुस्साट...
8
Petrol Diesel Price Hike: पहिले दूध, नंतर CNG आणि आता पेट्रोल-डिझेल महागलं... ज्याची भीती होती तेच झालं, ४८ तासांत ३ मोठे झटके
9
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
10
Maharashtra Farmer: सहा मोठ्या धरणांतील गाळ शेतकऱ्यांना देणार; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय 
11
शनी जयंती २०२६: तुम्हाला माहीत आहे का? शनी जयंतीला पिंपळाखाली 'कणकेचाच दिवा' का लावतात?
12
Petrol Diesel Price: पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ; सर्वसामान्यांच्या खिशावर नेमका काय परिणाम होणार? जाणून घ्या
13
सामान्यांचा खिसा आणखी रिकामा; महागाईचा ४२ महिन्यांचा उच्चांक; महागाईत सर्वाधिक तीव्र वाढ
14
डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचे निधन; ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
Sunil Bharti Mittal: अदानी-अंबानींच्या मार्गावर सुनील मित्तल; १० वर्षांत सोडणार Airtel ची खुर्ची, कोण असेल उत्तराधिकारी?
16
व्हॉट्सॲपवर ‘एआय’सोबतच्या गप्पा राहणार आता अतिशय गुप्त!
17
Petrol Diesel price hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन
18
सेन्सेक्स लवकरच ८९ हजारांवर? ‘मॉर्गन स्टॅन्ले’चा अहवाल; १५ टक्के वाढीचा अंदाज
19
आजचे राशीभविष्य - १५ मे २०२६, आर्थिक स्थिती मजबूत दिसेल; गैरसमजा पासून जपून राहावे
20
नॉर्मल पेट्रोल आणि प्रीमियम पेट्रोल म्हणजे काय? दोन्हीच्या किमतीत किती फरक असतो? जाणून घ्या...
Daily Top 2Weekly Top 5

काम सुधारा अन्यथा परिणामांना सामोरे जा

By admin | Updated: December 11, 2014 23:52 IST

रुपाली जाधव : महाविरतणाच्या अधिकाऱ्यांना दिला सज्जड इशारा

पिंपोडे बुद्रुक : कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. रब्बी हंगामातील पिके वाया जाण्याची शक्यता आहे. अपुऱ्या पाणी साठ्यावर पिके जगविण्यासाठी शेतकरी धडपड करीत आहे. मात्र महावितरणकडून अघोषित भारनियमनामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांबरोबर व्यापारी बांधावांमध्ये संतापाची भावना असून अधिकाऱ्यांनी आपल्या कारभारात सुधारणा करावी, अन्यथा परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवावी, असा सज्जड इशारा कोरेगाव पंचायत समितीच्या सभापती रुपाली जाधव यांनी दिला आहे.
वाठार स्टेशन उपविभागीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या सर्वच गावांमध्ये सध्या भारनियमनामध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. अगोदरच पाणीसाठे अपुरे आहेत. थोडेफार असलेले पाणी शेतकरी पिकांना देण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र वारंवार वीज खंडीत होत असल्यामुळे पिकांना पाणी पाजणे शेतकऱ्यांना अवघड होत आहे. मुळातच कृषिपंपांना २४ तासांतून केवळ आठ तास वीज दिली जाते, मात्र तो पुरवठाही पूर्णवेळ होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांपुढील अडचणी वाढतच आहेत.
पंपोडे बुद्रुक येथे वीज उपकेंद्र आहे. तेथून सोनके, पिंपोडे बुद्रुक, वाठारस्टेशन असे तीन फिडर करून वीज पुरवठा केला जातो. त्यातही घरगुती ग्राहक, व्यापारी, ग्राहकांबरोबर कृषी ग्राहक असे वेगवेगळे दोन विभाग करून भारनियमनाच्या वेळापत्रकाप्रमाणे वीज दिली जाते. काही गावांना आठवड्यातून चारवेळा दिवसा आणि तीन वेहा रात्रीची वीज कृषीपंपाना दिली जाते. दिवसा आणि रात्री शेतकरी विजेची वाट पाहत शेतात उभा असतो. मात्र विजेच्या लपंडावाने शेतकरी पुरता हैराण झाला आहे.
परिसरातील शेतकऱ्यांबरोबर व्यापारी, ग्राहकांनी आपली कैफियत सभापती रुपाली जाधव यांच्याकडे मांडली होती. त्यावेळी त्यांनी महावितरण अधिकाऱ्यांना आपला कारभार लवकर सुधारा, अन्यथा परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा, असे खडसावले. (वार्ताहर)

सद्यस्थितीत पंपाची वीज मागणी वाढली आहे. मात्र सातारारोड मधून मागणीपुरवठा नियंत्रीत होण्यात अडचणी येत आहेत. यामुळे वारंवार वीज पुरवठा खंडीत होत आहे. त्याचबरोबर पिंपोडे बुद्रुक येथील उपकेंद्रामध्ये वाढीव ट्रान्सफार्मरला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे भविष्यात अशा अडचणी उद्भवणार नाहीत. शेतकऱ्यांबरोबर सर्वच ग्राहकांनी सहकार्य करावे.
ए. वाय. साळवी, प्रभारी उप अभियंता,
वाठार स्टेशन, उपविभाग, महावितरण


विजेवर अवलंबून असणारे व्यवसाय अडचणीत
पिंपोडे बुद्रुक येथील वीज उपकेंद्रातून दोन ट्रान्सफार्मवरून तीन नियं९झ केले जाते, मात्र मागणी पुरवठ्याचे प्रमाण व्यस्त होत आहे. त्याठिकाणी आणखी एक ट्रान्सफार्मर असणे गरजेचे असूनही अधिकारी त्याबाबतीत प्रयत्न करीत नसल्याचे दिसून येते. परिणामी शेतकऱ्यांबरोबरच व्यापारी ग्राहकांची मोठी पंचायत झाली आहे. दुग्धजन्य पदार्थ विक्री करणारे छोटे-मोठे व्यावसायिक, पिठाची गिरणी व्यवसाय, फॅब्रिकेशन, झेरॉक्स, फोटो असे अनेक विजेची आवश्यकता असणारे व्यवसायही अडचणीत येत आहेत.