CoronaVirus कराडमध्ये पस्तीस वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2020 19:17 IST2020-04-02T19:17:25+5:302020-04-02T19:17:51+5:30

खंडाळा येथील एक महिला आणि साताऱ्यातील एक व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती.

CoronaVirus in Satara 35 year old youth Corona positive in Karad hrb | CoronaVirus कराडमध्ये पस्तीस वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण

CoronaVirus कराडमध्ये पस्तीस वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण

सातारा  :  सातारा जिल्ह्यामध्ये तिघांना कोरोनाची लागण झाली आहे. आज एका ३५ वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. 


खंडाळा येथील एक महिला आणि साताऱ्यातील एक व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती. आता  कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे १ एप्रिलला दाखल झालेल्या तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याच्या घशातील थुंकीचे नमुने पुण्याच्या एन.आय.व्ही. प्रयोगशाळेला पाठविण्यात आले होते. त्यांनी हा रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे कळविल्याचे जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी सांगितले. 
 

Web Title: CoronaVirus in Satara 35 year old youth Corona positive in Karad hrb