शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: फक्त उच्च शिक्षण पुरेसे नाही, सरकारी नोकरीसाठी सर्वोच्च न्यायालयाने घातली अट!
2
आजचे राशी भविष्य: २१ एप्रिल २०२६: हाती घेतलेली कामे पूर्ण होतील, 'या' राशींना धनलाभाचा योग
3
Learning License: लर्निंग लायसन्स प्रक्रिया पुन्हा 'ऑफलाईन'; गैरप्रकार रोखण्यासाठी आरटीओचे पाऊल
4
Government Employees Strike: सरकारी कर्मचारी, शिक्षक आजपासून बेमुदत संपावर, त्यांच्या मागण्या काय आहेत? 
5
Jammu Ramnagar Bus Accident: चालकाचे नियंत्रण सुटलं, बस डोंगरावरून १०० मीटर खोल दरीत कोसळली, २१ जण ठार
6
शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींची भरभराट, नवीन नोकरीची संधी; उत्पन्नात वाढ, पण बजेट सांभाळा!
7
Ashwini Paul: पार्टनरला भेटायला गेली अन् बनली ड्रग्ज सप्लायर, कोण आहे अश्विनी पॉल?
8
नेस्को ड्रग्ज प्रकरण: अनेक ड्रग्ज पेडलर्स, कॉन्सर्टमध्ये ‘विदाउट तिकीट’!
9
Donald Trump: शांतता करार आजच होणार; इराणचे शिष्टमंडळही पोहोचणार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
10
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
11
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
12
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
13
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
14
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
15
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
16
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
17
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
18
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
19
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
20
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : जिल्ह्यात आणखी एकाचा कोरोनामुळे बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 13:32 IST

सातारा जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाची भीषणता वाढत असून, कऱ्हाड येथील मलकापूरमधील एका ४७ वर्षीय कोराना बाधित व्यक्तीचा गुरुवारी पहाटे मृत्यू झाला. तर दुसरीकडे तब्बल २३० जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने प्रशासनाला दिलासा मिळाला. जिल्ह्यात कोरोनामुळे बळींची संख्या आता १५ वर पोहोचली असून, बाधित रुग्णांची संख्या ४२२ झाली आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात आणखी एकाचा कोरोनामुळे बळीमृत्यूचा आकडा १५ वर; २३० जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह

सातारा : जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाची भीषणता वाढत असून, कऱ्हाड येथील मलकापूरमधील एका ४७ वर्षीय कोराना बाधित व्यक्तीचा गुरुवारी पहाटे मृत्यू झाला. तर दुसरीकडे तब्बल २३० जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने प्रशासनाला दिलासा मिळाला. जिल्ह्यात कोरोनामुळे बळींची संख्या आता १५ वर पोहोचली असून, बाधित रुग्णांची संख्या ४२२ झाली आहे.जिल्ह्यात बुधवारी एकाच दिवशी सहाजणांचा मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण जिल्हा हादरून गेला होता. बाधित रुग्णांबरोबरच रुग्णांच्या मृत्यूचेही प्रमाण वाढत असल्याने सध्याची परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली आहे.

कऱ्हाडतालुक्यातील मलकापूर येथील स्वत:च्या मालकीच्या घरात राहणारा व मूळ पाटण तालुक्यातील बाचोलीतील रहिवाशी असलेल्या ४७ वर्षीय कोरोना बाधित व्यक्तीचा गुरुवारी पहाटे मृत्यू झाला.

ही व्यक्ती पनवेल येथून प्रवास करून आली होती. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने दि. २१ रोजी त्यांना कऱ्हाडमधील कृष्णा मेडीकल कॉलेज येथे दाखल करण्यात आले होते. या रुग्णाला सुरूवातीपासून उच्च रक्तदाबाचा त्रासही होता, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.दरम्यान, एकीकडे रुग्णांच्या बळींचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे प्रशासन चिंतेत असतानाच दुसरीकडे मात्र, कोरोना संशयितांचे रिपोर्ट निगेटिव्ह येण्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे धाकधूक कमी होत आहे.

गुरूवारी सकाळी तब्बल २३० जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. त्यामध्ये पुणे येथून १९१ तर कृष्णा मेडिकल कॉलेज, कºहाड येथून ३९ अशा २३० जणांचा समावेश आहे. तसेच जिल्हा शासकीय रुग्णालयातील २७ जणांच्या घशातील स्त्रवांचे नमुने पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.जिल्ह्यात आत्तापर्यंत ४२२ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून, यापैकी १२६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर १५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या २८१ कोरोना बाधित रुग्णांवर विविध ठिकाणी विलगीकरण कक्षात उपचार सुरु आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर