शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : गुलबहार हॉटेल मालकांसह चौघांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 18:53 IST

सातारा येथील पोवई नाक्यावरील गुलबहार हॉटेलवरील कारवाईचा अखेर पदार्फाश झाला. सहायक पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी टाकलेल्या छाप्यात हॉटेल मालकांसह चौघांवर गुन्हा दाखल झाला. कोरोना काळात हे हॉटेल शासनाने अधिग्रहित केले असतानाही येथे खासगी लोकांना जेवण देणे, लॉजिंगसाठी रुम देण्याचे प्रकार होत असल्याचे उघड झाले.

ठळक मुद्देगुलबहार हॉटेल मालकांसह चौघांवर गुन्हालॉकडाऊनमध्ये खासगी लोकांना जेवण, लॉजिंग देणे भोवले

सातारा : येथील पोवई नाक्यावरील गुलबहार हॉटेलवरील कारवाईचा अखेर पदार्फाश झाला. सहायक पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी टाकलेल्या छाप्यात हॉटेल मालकांसह चौघांवर गुन्हा दाखल झाला. कोरोना काळात हे हॉटेल शासनाने अधिग्रहित केले असतानाही येथे खासगी लोकांना जेवण देणे, लॉजिंगसाठी रुम देण्याचे प्रकार होत असल्याचे उघड झाले.हॉटेल मालक हरदीपसिंग गुरमितसिंग रामगडीया (रा. रविवार पेठ, सातारा), हॉटेल मालक कमलेश मधुकर पिसाळ (रा. केसरकर पेठ, सातारा), किशोर संजय मोहिते (वय २७, रा. कोडोली, ता. सातारा), धनंजय महादेव देसाई (वय ४२, रा. गोडोली, सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोवई नाक्यावरील गुलबहार हॉटेलमध्ये पार्टी चालू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याची दखल घेत सहायक पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या पथकाने या हॉटेलवर छापा टाकला होता. या छाप्यामध्ये सुमारे चार ते पाच तास हॉटेलची तपासणी करण्यात आली. पोलिसांनी कारवाई केल्यानंतर तत्काळ गुन्हा दाखल होणे आवश्यक होते. मात्र, दोन दिवस उलटले तरीही गुन्हा दाखल झाला नाही.सीसीटीव्ही फुटेजवर माहिती संकलित करण्यासाठीमुळे गुन्हा दाखल होण्यास वेळ लागल्याचे वरिष्ठांनी सांगितले. समीर शेख यांनी या प्रकरणाचा तपास करुन त्याबाबतचा अहवाल पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्याकडे सादर केला. त्यानुसार वरील चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.सीसीटीव्हीतून पर्दाफाशशासनाने गुलबहार हॉटेलचे अधिग्रहण केले आहे. असे असतानाही हॉटेलमध्ये तब्बल तीस लोकांनी जेवण केल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरुन दिसत आहे. हॉटेलच्या संगणकावरुन १९ बिले देण्यात आली असून, ती बिले जप्त करण्यात आली आहे. तसेच खासगी लोकांना राहण्यासाठी लॉजिंग दिल्याचे उघड झाल आहे.अधिकाऱ्याला का वाचवतायत?गुलबहार हॉटेलची कारवाई करताना सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले असता त्यामध्ये एक शासकीय अधिकारी मित्रांसमवेत दारु पित जेवण करताना आढळून आला आहे. मनाई असताना हॉटेल सुरु ठेवले, त्यातही जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग करत तेथे जेवण, दारु पिल्याचे दिसत आहे. पोलिसांच्या अहवालात संबंधित अधिकाऱ्याचे नाव असून, त्याच्यावरही गुन्हा का दाखल केला जात नाही, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसरhotelहॉटेल