शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
2
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
3
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
4
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
5
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
6
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
7
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
8
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
9
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
10
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
11
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
12
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
13
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
14
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
15
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
16
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
17
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
18
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
19
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
20
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय; अखेर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर पण नाराजी कायम?

corona virus : छातीत धाकधूक; काम बिनचूक !,झेडपीच्या २९० कर्मचाऱ्यांना बाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2020 1:06 PM

नितीन काळेल सातारा : मिनीमंत्रालय समजणाऱ्या  जिल्हा परिषदेत कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे एक-एक विभाग बंद ठेवावा लागतोय. ...

ठळक मुद्दे छातीत धाकधूक; काम बिनचूक !,झेडपीच्या २९० कर्मचाऱ्यांना बाधानागरिकांच्या वर्दळीमुळे कोरोना जवळच; कार्यालयात पाऊल भीती घेऊनच

नितीन काळेलसातारा : मिनीमंत्रालय समजणाऱ्या जिल्हा परिषदेत कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे एक-एक विभाग बंद ठेवावा लागतोय. त्यातच छातीत धाकधूक ठेवूनच कर्मचाऱ्यांना फाईलींचा निपटाराही करावा लागतोय. दुसरीकडे नागरिकांच्या गर्दीमुळे कोरोना जवळच बागडत असल्याचे वास्तवही समोर आलंय. अशामुळेच आतार्पंत झेडपीकडील २९० कर्मचाऱ्यांना कोरोना झालाय !जिल्ह्यात मार्च महिन्यापासून कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. जिल्हा परिषदेत मात्र, जुलै महिन्यात कोरोना शिरकाव झाला. एका पदाधिकाऱ्यांला आणि अन्य एका कर्मचाऱ्याला कोरोना झाला. त्यानंतर कोरोनाचा हा सिलसिला सतत सुरू राहिला.

गेल्या दीड महिन्यात तर सतत आज या विभागात तर त्यानंतर दुसऱ्या विभागात रुग्ण आढळत आहेत. तसेच जिल्ह्यात विविध ठिकाणी काम करणारे जिल्हा परिषदेचे कर्मचारीही बाधित होऊ लागले आहेत. त्यामुळे आतापर्यंत झेडपीकडील २९० कर्मचाऱ्यांना कोरोनाचा स्पर्श झालाय.सातारा जिल्हा परिषद इमारतीत तर कोरोनाने चांगलाच शिरकाव केलाय. अनेक विभागांतील कर्मचाऱ्यांना कोरोना झाला आहे. त्यामुळे संबंधित विभाग काही दिवसांसाठी बंद ठेवण्यात येतोय. त्या कार्यालयाचे सॅनिटायझेशन करण्यात येते.

ऐवढेच नाही तर त्या विभागात संपर्कात असणाऱ्या सर्वच कर्मचाऱ्यांचीच चाचणी करण्यात येते. अशाचप्रकारे बुधवारी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान विभागात एक-दोन नाही तर चौघेजण बाधित सापडले. त्यामुळे आख्खा विभागच बंद करण्यात आलाय. कार्यालयाला कुलुपच लावलंय.या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेतील वस्तूस्थिती पाहिल्यावर अधिकारी आणि कर्मचारी कोरोनाच्या सावटातच काम करताना दिसत आहेत. आपल्या समोरील काम कसे होईल, हे सर्वांकडून पाहिले जात होते. पण, मनात कोठेतरी भीती दिसून येत होती. याबाबत काहींनी तर कोरोनाला बरोबर घेऊनच आम्ही कामे करतो, अशी स्पष्टता दिली.

याला कारण, म्हणजे आजही जिल्हा परिषदेत अनेक नागरिक कामे घेऊन येत आहेत. त्यामुळे बांधकामसारख्या विभागात गर्दी दिसून आली. सोशल डिस्टन्सिंगही या नागरिकांकडून पाळण्यात येत नाही. त्यामुळे नागरिक अवतीभवती वावरत असतानाच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ये-जा तसेच कामे करावी लागत आहेत.

प्रशासनाने नागरिकांना अति महत्वाचे काम असेल तरच येण्याचे आवाहन केले आहे. पण, याकडे नागरिकांकडून दुर्लक्ष होताना दिसून येत असल्याचे वास्तवही समोर आलं आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका अधिकच वाढत आहे.आतापर्यंत या विभागात रुग्ण आढळले...अर्थ, बांधकाम, आरोग्य, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, रोजगार हमी योजना, समाजकल्याण विभाग. जिल्ह्यातील काही पंचायत समितीत.

वादाचे प्रसंग निर्माण...जिल्हा परिषद इमारतीच्या मुख्य दरवाज्याजवळ टेबल ठेवण्यात आलेला आहे. तेथे नागरिकांची पत्रे, निवेदन घेण्याची व्यवस्था आहे. पण, नागरिक थेट विभागात जात आहेत. कर्मचाऱ्यांनी विचारणा केली तर नागरिकांकडून वादही घातला जातो. काहीजण तर थेट नेत्यांना कॉल करुन कार्यालयात सोडण्यासाठी गळ घालत असतात.

कोरोना काळात प्रशासन चिकाटीने काम करत आहे. नागरिकांनीच सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. अत्यंत महत्वाचे काम असेल तरच जिल्हा परिषदेत यावे. अर्ज, निवेदने मेलवर पाठवली तरी त्यांचे प्रश्न सुटू शकतात.- मनोज जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन)

जिल्हा परिषदेत कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. त्यासाठी ५० टक्के कर्मचाऱ्यांवर काम सुरू ठेवण्याबाबत संघटनांच्या वतीने अधिकाऱ्यांना भेटलो. प्रकृतीचा त्रास होत असेल अशा कर्मचाऱ्यांनी काळजी घ्यावी.- काका पाटील, जिल्हाध्यक्ष जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याzpजिल्हा परिषदSatara areaसातारा परिसर